बदलापूर येथील घटनेच्या पार्श्व भूमीवर सत्यसाई कार्तिक यांच्या शाळा,कॉलेज,प्राचार्य,मॅनेजमेंट,महिला शिक्षिका,पोलीस विभाग यांना सूचना



मावळ मराठा न्युज:- लोणावळा,राज्यात व देशभरात शालेय विद्यार्थी यांचेवर होत असलेल्या अत्याचाराचे घटनांमध्ये वाढत होताना दिसुन येत आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे सुरक्षेसाठी ता. २२/८/२०२४ रोजी लोणावळा विभागातील लोणावळा शहर,लोणावळा ग्रामीण, कामशेत,वडगाव मावळ पोस्टे हद्दीतील शाळा,कॉलेज मधील मुख्याधिकारी,प्राचार्य, मॅनेजमेंट,महिला शिक्षिका,पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी/विद्यार्थीनी यांचे सुरक्षेबाबत काहीमहत्वाच्या सुचना देण्यात आल्या.आहेत. यात १) शाळा, कॉलेज परीसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्याचे मॉनिटरिंग करणे,२) शाळा, कॉलेजमध्ये तक्रार पेटी सुरक्षित ठिकाणी बसवुन ती नियमित उघडुन त्यातील तक्रारींचे निवारण करणे३) शाळा,कॉलेज परीसरातील ग्रे एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,४) विद्यार्थी सुरक्षा समिती व समुपदेशन कक्षाची स्थापना करणे५) प्रवेशव्दार,बाहेर पडण्याचे गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवून त्याव्दारे सुचना देणे,६) पोलीस दादा, पोलीस दिदी, निर्भया पथक,पोलीस पेट्रोलींग याव्दारे शाळा,कॉलेज येथे भेटी देऊन विद्यार्थी,विद्यार्थीनी यांचे सुरक्षेचा नियमित आढावा घेणे.७) महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांचे मार्फतीने विद्यार्थीनीचे समस्या जाणून घेवुन कार्यवाहीकरणे.८) शाळा, कॉलेज मधील सर्व स्टाफ, वॉर्डन, सफाईकामगार, बस ड्रायव्हर, सुरक्षारक्षक यांचे चारीत्र पडताळणी करून घेणे९) शाळा कॉलेज परीसरातील पानटपरी, दुकाने यांची चेकींग करणे, १०) शाळा कॉलेज परीसरात पोलीस पेट्रोलींग करणे११) शाळा, कॉलेज प्रवेशव्दार व बाहेर पडण्याचे ठिकाणी बाहेरील इसमांची व संशयित व्यक्तीची चेकींग करणे,१२) शाळा, कॉलेज मध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्याव्दारे सीसीटीव्हीव्दारे संपुर्ण परीसरावरनियंत्रण ठेवणे.१३) शाळा, कॉलेज परीसरात वाढत चाललेले अमली पदार्थाचे सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानाव्दारे विद्यार्थीमध्ये जन जागृती करण्यातआली तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी वरीलप्रमाणे विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करून पोलीस स्टेशन निहाय प्रत्येक शाळा, कॉलेजकरीता पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्ती करून शाळा, कॉलेज येथे पोलीस पेट्रोलींग करून अशा दुर्देवी घटना घडणार नाहीत याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असा विश्वास लोणावळा विभागाचे सहा. पोलीस अधिक्षक आयपीएस श्री सत्यसाई कार्तीक यांनी उपस्थिताना दिला.




