पोरवाल यांच्या घराजवळील इंद्रायणी नदीवरील बेकायदेशीर भराव वर लोणावळा नगरपरिषदेचा अखेर हतोडा

मावळ मराठा न्यूज़ :-लोनावला, लोणावळ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रकाश मिश्रीमल पोरवाल हे अडीच तीन वर्षे पुर्ण प्रयत्न करुन देखील स्वतःच्या इंद्रायणी नदीवर अडथळा ठरणारा बेकायदेशीर भराव टाकून व नदीवर अतिक्रमण करुन चुकीच्या पद्धतीने केलेल्या बांधकामावर राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण यांनी आदेश देउन देखील तत्कालीन मुख्याधिकारी पंडीत पाटील हे कार्रवाई करीत नसल्यामुळे गोरगरीबांचा मिळकत कर स्वरुपात गोळा केलेल्या पैशाचा वापर नगरपालीका दंड स्वरुपात भरुन आजचे मरण उदयावर टाळत होती. आत्तापर्यंत नगरपालीकेने स्वतःच्या कामचुकारपणामुळे व कुणाच्या धमक्यांना घाबरुन सदर तोड कार्रवाई न केल्यामुळे न्यायालयाने अंदाजे रक्कम रुपये २१ लाखापर्यंत एवढा दंड ठोठावला असून सदर कार्रवाई पुर्ण होईपर्यंत दररोज रुपये २५००० /- अशी ही वाढीव दंडाची रक्कम नगरपालीकेवर ठोठावली आहे. वेळेवर कर न भरु शकणा-या गोरगरीबांच्या घरांवर जप्ती किंवा इतर कायदेशीर कार्रवाई करणा-या नगरपालीकेच्या भोंगळ कारभार करणाऱ्या प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे जनतेच्या कर स्वरुपात गोळा केलेल्या रकमेची ही वाताहत म्हणावी लागेल . नवीनच कार्यभार स्वीकारलेले लोनावला नग रपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मात्र पोरवाल यांच्या भाकड धमक्यांना न जुमानता पोरवाल यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले असता पोरवाल यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे विरुद्धच खटला भरण्यात यावा अशी मागणी करीत चक्क भर रस्त्यात चादर अंथरुन त्यावर झोपून त्यास राडा घालण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न लोणावळा उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पोलिस निरीक्षक डुबल यांनी हाणून पाड़ला. झालेल्या या कार्रवाईनंतर सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिक यांचेमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे असा विश्वास निर्माण झाला आहे . सदर संपूर्ण कारवाई वर लोणावळेकर नागरिकांचे लक्ष आहे . नवीनच कार्यभार स्वीकारलेले मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मात्र तीन वर्षे प्रलंबित ,पालिकेला खड्ड्यात टाकणारी कारवाई त्वरित केल्याने आणि लाखो रूपये एका व्यक्तीच्या बेकायदेशीर भराव काढण्याचे कामाला प्राथमिकतेने सोडवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .मावळ मराठा न्यूज़ परिवारकडून त्यांचे अभिनंदन आणि या पुढील काळात त्यांचे कडून असेच जनहितचे कार्य होवो हीच शुभेछा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page