लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांच्या इंद्रायणीवरील अनधिकृत बांधकाम प्रशासन तोडणार का?

मावळ मराठा न्यूज,लोणावळा:-लोणावळा इंद्रायणी नदीवरील २५७ चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केलेल्या प्रकाश पोरवाल यांचे विरोधात राष्ट्रीय हरित लवादचा निर्णयाच्या २ वर्षानंतर देखील लोणावळा नगर परिषद सदर बांधकामावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही,यासाठी नगरपरिषदेला जनतेच्या कर रुपी येणाऱ्या पैशातून एकदा १५ लाख आणि एकदा ५ लाख असा एकूण २० लाख दंड ठोठावला होता.तरी नगर परिषद कोणतीही कारवाई करत नव्हती शेवटी राष्ट्रीय हरित लवादाने १६ डिसेंबर २०२२ ला १५ दिवसात सदर इंद्रायणी नदी वरील २५७ चौरस मीटर बेकायदेशीर बांधकाम पोलिसांची मदत घेवून तोडावे असा आदेश काढला.तरी देखील लोणावळा नगरपरिषद राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीय. लोणावळा नगरपरिषदेने सदर बांधकाम दिखावा म्हणून तोडायला तर घेतले मात्र प्रकाश पोरवाल हे जे सी बी पुढे येवून झोपून न्यायालयाचा आदेशाचा अवमान होत असताना लोणावळा नगरपरिषद मात्र बघ्याचीच भूमिका घेत आहे. २५७ चौरस मीटर बेकायदेशीर बांधकाम असताना पालिकेने राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशानुसार त्याचा १५ टक्के देखील बांधकाम अद्याप तोडलेले नाही त्यामुळे पालिका प्रशासन आदेशाची अंमलबजावणी का करत नाही,प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? की त्यामागे आर्थिक व्यवहार झालेत का? असा सवाल लोनवलेकर विचारत आहेत. अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना २० लाख रुपयाचा भूदंड बसलेला आहे. दोन वर्षे कोणतीही कारवाई न करणाऱ्या नगरपरिषदला कोर्टाने अनेकदा फटकारले असताना अजून कशाची आणि कुणाची वाट पाहत आहे अशी शंका या मागे येते.पालिकेतील संबधित विभागाला या संधर्भात विचारले असता काही माहित नाही असे सांगितले जात आहे. मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी मात्र पालिका कर्मचारी आणि अधिकारी आणि पोलिसांची मदत घेवून सदर न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करू आणि अनधिकृत पूर्ण बांधकाम या १५ तारखे पर्यंत पाडण्यात येईल असे एम एन न्यूज शी बोलताना सांगितले आहे. परंतु आदेशात दिलेली मुदत संपली असून आता कोणतीही कारवाई होताना दिसत नाही,तरीही पाहू या १५ जानेवारी पर्यंत मुख्याधिकारी सदर बांधकाम पाडतात की पुन्हा जैसे थे ची भूमिका घेतात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page