खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्षपदी (कुमार केसरी)पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड

मावळ मराठा न्युज खेड,नुकतीच नव्याने नोंदणीकृत झालेल्या खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघास आज पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.मेघराज कटक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे यांनी खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पै. बाळासाहेब उर्फ मारुती काळूराम चौधरी यांच्याकडे मान्यतेचे निवडीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी उपस्थितांमध्ये आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव सर ,मुरलीधर चौधरी सामाजिक कार्यकर्ते, शांताराम कदम उपसरपंच, गोविंद चौधरी चेअरमन, वाल्मीक शिंदे सरपंच, अनिल शिंदे पोलीस पाटील, दीपक चौधरी सरपंच, पै .अजिंक्य चौधरी राष्ट्रीय खेळाडू, तसेच खेड तालुक्यातील नामांकित कुस्तीगीर कुमार भारत केसरी अक्षय तर्फे शिवराय केसरी अक्षय जगनाडे राष्ट्रीय विजेता विशाल थोरवे आंतरराष्ट्रीय खेळाडू आदर्श गुंड महाराष्ट्र चॅम्पियन अक्षय गावडे अभिजीत गावडे उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page