पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे निष्पन्न,महिलेच्या पतीसह तिघांना अटक


मावळ मराठा न्यूज:- प्रतिनिधी,पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून; महिलेच्या पतीसह तिघांना अटक वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नांदेड जिल्ह्यात हा मृतदेह आढळला असून तिथल्या पोलिसांनी तिघांना ताब्यातही घेतलं होतं. आता त्या तिघांचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे. त्यात संबंधित विवाहित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्याचा चालक अशा तिघांचा यात समावेश आहे. त्यांनी वकिलाचे ३१ डिसेंबरच्या दुपारी कार्यालयातून अपहरण केले. हात-पाय अन् तोंड बांधून वकिलास एका ड्रममध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन् तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पण पिंपरी चिंचवड ते नांदेड या दरम्यानच्या काळात हत्या कशी केली, हे पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून, महिलेच्या पतीसह तिघांना अटकपिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला होता. वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी संबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे.




