*यंदा स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा मावळात*

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,चालू शैक्षणिक वर्षातील स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा मावळ तालुक्यात घेण्याचे आदेश मा. शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त मा. श्रीमती ललिता दहितुले (प्राथमिक)व मा. शिक्षणाधिकारी तथा जिल्हा आयुक्त स्काऊट श्री. भाऊसाहेब कारेकर (माध्यमिक )व  यांनी दिले असून. त्यासंदर्भात आयोजनाबाबत मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी तथा साहाय्यक जिल्हा आयुक्त (गाईड) श्रीमती शिल्पा रोडगे, जिल्हा संघटक (स्काऊट) श्री. दिगंबर करंडे यांचे मार्गदर्शनाखली डॉन बॉस्को हायस्कूल लोणावळा येथे दि.२८ ऑक्टोबर रोजी स्थळ पाहणी दौरा आणि सभा संपन्न झाली. शाळेचे प्राचार्य मा. श्री. किरण साळवी यांनी टीमचे स्वागत केले आणि गट शिक्षणाधिकारी यांचे आवाहनाला दुजोरा देत त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.या तीन दिवशीय निसर्ग निवास मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे दीड हजार स्काऊट-गाईड (विद्यार्थी) व दोनशे स्काऊटर-गाईडर (शिक्षक) प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे तसेच समस्त मावळ तथा लोणावळेकरांसाठी हा मेळावा प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे श्री. करंडे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा आयुक्त (स्काऊट) प्रौढ संसाधन श्री. रफेल जॉन स्वामी, साहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) श्री. विजयकुमार जोरी, प्रशिक्षण समुपदेशक श्री. शैलेश चंद, विस्तार अधिकारी श्री. संदीप काळे, श्री. शामराव इंदोरे, श्री. नवनाथ दर्शाले, समन्वयक श्रीमती बिल्कीसबानू अन्सारी, केंद्र प्रमुख श्री. लोणकर सर व श्री. अविनाश लोमटे, लोणावळा न.पा शाळा क्रं.२ चे सहशिक्षक श्री. साबळे सर इ. उपस्थित होते. डॉन बॉस्को हायस्कूल चे स्काऊटर श्री. दिनेश डिसूझा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page