आंबवणे येथे सहयाद्री च्या घाट माथ्यावर बहरले मिनी कास पठार



मावळ मराठा न्युज :-आंबावणे,सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध कास पठार आहे. त्या ठिकाणी रान हळद, आभाळी, भारंगी, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, गेंद, निसर्डी, जरतारी, दीपकाडी, निळकंनी, रानजिरं, या प्रजातीची रंगीबेरंगी फूल झाडे जुलै ते सप्टेंबर महिन्यात बहरतात. हे सृष्टी चे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने तिथे जातात. निसर्गाचा आनंद लुटतात.मुबंई – पुण्यातील पर्यटकासाठी अगदी तशीच पर्वनी लोणावळा पासून अंबी व्ह्याली रोडवर सहयाद्री च्या घाटमाथ्यावरील पठारावर लोणावळा पासून १५ किलोमीटर अंतरावर सौंदर्याने नटलेली आहे.राखीव वनाच्या जवळ पास २०० ते ३०० एकर परिसरात या वर्षी कारवी चा प्रकार असलेली स्थानिक” खराळा “नावाची निळसर रंगाची फूलझाडे अवतरली आहेत. त्यांची उंची २ ते ४ फूट आहे. अगदी तशीच निळ्या रंगाची फूल असणारी खरी कारवी याच परिसरात आहे. वाळल्या नंतर ग्रामीण भागात कारवी चा सरपंणासाठी वापर होत असतो.खऱ्या कारवी ची उंची ५ ते १० फूट एव्हडी असते. या परिसरात दरवर्षी बहरणारी सोनकी नावाने ओळखली जाणारी व भरपूर प्रमाणात आढळणारी पिवळ्या रंगाची फूल झाडे मोठया प्रमाणात आढळते.त्याशिवाय तेरडा ( गंगागोवर ),मिकी माउस, निसुर्डी, व गौरी गणपतीला वापरतात ती शिंदलवण (चोळ्याची फुल ) अश्या अनेक फूलझाडांच्या प्रजाती येथे आहेत..शेतीच्या व इतर धार्मिक विधी साठी या फूल झाडांना महत्व आहे.(झाल असं या वर्षी १५ सप्टेंबर पासून खराळा या निळ्या फूलांचा बहार सुरू झाला. हे फारसे कुणाला माहित नव्हते.सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे शाळेने शाळेपासून 7 किलोमीटर अंतर असलेल्या या ठिकाणी 19 सप्टेंबर ला पावसाळी सहलीचे आयोजन केले. आणि फूलांनी अच्छादन केलेल्या या निसर्गाचा व तेथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सर्वच सोशल मीडियाद्वारे या ठिकाणाची नव्याने जगाला ओळख करून दिली. अनेकांनी फोन करून ठिकाणाबद्दल जाणून घेतले. आज हजारो पर्यटक येथे येत आहेत. आज मिनी कास पठार म्हणून सर्व दूर ओळख निर्माण झाली. नावीन्य पूर्ण उपक्रमाबाबत कोराई गड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज यांनी कौतुक केले.)विस्तीर्ण पसरलेला हा निसर्गाचा अनमोल ठेवा सप्टेंबर महिन्यात अनुभवता येतो. याच्या सुंदरते चा कालावधी 21 ते 30 दिवसांचा असतो. ऍम्ब्ये व्हॅली ला जाणाऱ्या रस्त्यालगत खराळा बहरलेली दिसते.त्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास अधिक उत्तम असते. परंतु टायगर पॉईंट व घुसाळगाव या परिसरात दाट धुके सतत निर्माण होते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. हे प्रत्यक्ष दर्शी हवामानावर अवलंबून असते. प्रत्येकाने आनंद घ्यावा.मात्र येणाऱ्या पर्यटकांनी स्वतः सोबत च्या टाकाऊ पदार्थाचा कचरा होणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे.अन्यथा सहयाद्रीच्या निसर्गाचा व त्यात असणाऱ्या सुंदरतेचा अर्थातच पर्यावरनाचा नाश होईल.




