क्रिकेटचा बादशाह विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी संपर्क संस्थेच्या मुलांना दिला यशाचा मंत्र

मावळ मराठा न्यूज: – मळवली,कोणीही या स्पर्धेच्या युगात शॉर्ट कर्ट ने स्टार होऊ शकत नाही त्यासाठी त्याग चिकाटी आणि जबरदस्त मेहनीतीची गरज लागते.. विराट कोहली आज ज्या शिखरांवर आहे तो त्याच्या त्याग, चिकाटी, लढाऊ वृत्ती आणि हुशारीने मी फक्त त्याला योग्य मार्गदर्शन केले त्याच्या मध्ये उपजतच एक उत्कृष्ट क्रिकेटर जे गुण होते ते मी हेरले विराट दहा वर्षाचा असल्या पासून मी त्याला प्रशिक्षण देतोय तुम्ही ही मेहनत करा यश नक्की मिळेल -असे क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे संपर्क संस्था मलवली केंद्रातील मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले..संपर्क मळवली केंद्रात विराट कोहलीच्या कोच चे मुलांनी फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले.राजकुमार बरोबर बंगलोर रॉयल चॅलेज टीम चा खेळाडू अनुज रावत होतासंपर्क संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अमित बॅनर्जी यांनी पुष्पगुछ व संपर्क शाल देऊन त्यांचे स्वागत केले संपर्कच्या सदस्य मिनू सिंघवी यांनी अनुज रावत यांचे स्वागत केले यावेळी मुलांना व पत्रकारांना संबोधित करताना प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आपण संस्थेच्या उपक्रमानी प्रभावित झालो आहोत मी येथील मुलांना भेटण्यासाठी विराट कोहलीला नक्की आणेल अशी ग्वाही दिलीसंपर्क चे संस्थापक अमित बॅनर्जी यांनी त्यांनी आवर्जून मुलांना भेटून मुलांना क्रिकेटचे धडे दिले मोलाचे मार्गदर्शन केले यामुळे मुलांना एक नवी ऊर्जा मिळेल व येथून ही एखादा विराट निर्माण होईल अशी अशा व्यक्त केली व राजकुमार यांचे आभार मानलेयावेळी मुलांनी बंगलोर रॉयल चॅलेंज टीमचा क्रिकेटपट्टू अनुज रावत यांच्याशी क्रिकेट चा खेळ रंगवला तर मुलांनी राजकुमार यांच्याकडून क्रिकेटच्या टिप्स घेतल्याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपर्क चे जनसंपर्क प्रमुख प्रदीप वाडेकर यांनी केलेकार्यक्रमचे नियोजन संपर्काचे कार्यकारी अधिकारी अनुज सिंग व सतीश माळी यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page