आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य जनजागृती








मावळ मराठा न्युज – लोणावळा,आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ लोनावला व सूक्ष्म योगा फाउंडेशन संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सुमित्रा हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमात PCOD, PCOS, हार्मोनल असंतुलन, डायट व्यवस्थापन तसेच हृदयविकार यांसारख्या महिलांमध्ये वाढत चाललेल्या आरोग्य समस्यांबाबत तज्ञांनी सविस्तर माहिती दिली. महिलांनी दैनंदिन जीवनात कोणती काळजी घ्यावी, योग्य आहार आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात माजी नगरा अध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते कारण्यत आली. कार्यक्रमाला सुमारे ९० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. महिलांसाठी झुंबा आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व अशा प्रकारचे उपक्रम समाजात नियमितपणे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाची सांगता नगर सेविका रेशमाजी पाठारे यांचा हस्ते सर्व महिलाना सर्टिफिकेट देउन सम्मान करन्यात आला. लायंस क्लबच्या अध्यक्षा ला. साधना टाटिया, सेक्रेटरी ला. सारिका अग्रवाल, ट्रेजरर ला. सुमित भदेशिया, एक्टिविटी चेयरमन ला. सारिका सुराणा यानी सहयोग दिले.



