शिवदुर्ग रिस्कयूची कौतुकस्पद कामगिरी,अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओने शोधले लोकेशन,

मावळ मराठा न्यूज दिनांक ०९/१०/२०२४ चाकण येथील तरुण सुर्यकांत रामदयाल प्रजापती वय वर्षे २७ हा दुपारी १ .०० वाजता घरातून बाहेर पडला तो घरी परत आलाच नाही. १०/१०/२०२४ ला चाकण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल झाली व फोन रेकॉर्ड, डिटेल्स काढले तर लास्ट लोकेशन लोणावळ्यात दिसत होते. मग शोध लोणावळ्यात चालू झाला. पोलीस यंत्रणा कार्यरत झाली. दिनांक ११/१०/२०२४ चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी लोणावळ्यात आले होते. त्यांच्या बरोबर फोन वर बोलणे झाले . पण त्यांच्या म्हणण्यानुसार लायन्स पॉईंट चा एक व्हिडिओ आहे. त्यामुळे तो चेक करायचा आहे व ड्रोनच्या साहाय्याने काही होईल का अशी विचारणा केली. त्या दोन तीन दिवसांत लोणावळ्यात खुप पाऊस व धूके होते त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने शोध घेणे सोपे नाही असे आम्ही सांगितले. टिमची पण चर्चा झाली लायन्स पॉईंट वर सर्च ऑपरेशन करायचे आहे तयारीत रहावे . पण डिटेल्स काही आले नाही. दिनांक १३/१०/२०२४ रोजी खोपोलीतून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टिमचे प्रमुख श्री गुरुनाथ साठिलकर यांचा फोन आला व त्यांनी तो दोन सेकंदाचा व्हिडिओ पाठवला. तो ग्रुपमध्ये पाठवला व लोकेशन कुठे वाटते म्हणून विचारले तर बरेच जण ते राजमाची गार्डन खंडाळा घाटाजवळ वाटतंय असे सांगितले. लायन्स पॉईंट ची खोली व या व्हिडिओ तील खोली जूळत नव्हती. आम्ही शोध घ्यायचे ठरवले पण अजून काही माहिती मिळते का बघत होतो. म्हणजे संपूर्ण टिमची मेहनत वाया जात नाही. दिनांक १५/१०/२०२४ सुर्यकांत प्रजापतीचा छोटा भाऊ, मामा व मित्र शोध मोहीमेसाठी आले होते स्वतः लोकेशन शोधाशोध करून संध्याकाळी शिवदुर्ग टीमला फोन केला. राजमाची गार्डनच्या लोकेशन वर जाऊन ते आले व एक गोष्ट त्यानी नोटीस केली की मागचा बॅकग्राऊंड मध्ये काही गोष्टी सेम टू सेम दिसत आहे. आमच्या डोक्यात तेच लोकेशन होते पण शोध घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे योग्य कारण सापडत नव्हते. ते या भेटीत आम्हाला मिळाले होते.एक कॉल रेकॉर्डिंग वरुन लगेचच शोध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला व दूसऱ्याच‌ दिवशी म्हणजे आज सकाळी नऊ वाजता शोध चालू झाला.लोकेशन व व्हिडिओ जरी मिळाला तरी योग्य ती जागा, सापडणे महत्वाचे असते त्यात आपले कौशल्य दाखवणे आवश्यक असते. बरेच वेळा फोन टाकून देऊन किंवा मिसगाईड करायचे प्रकार होत असतात. सर्व टिमने एकत्र येऊन चर्चा केली व एक जागा निवडली व तीच फायनल जागा होती. सेट अप तयार केला योगेश उंबरे, खाली जाऊन शोध घेऊ लागले व पहिल्या विस पंचवीस फुटांवर त्याचा मोबाईल फोन योगेश ला दिसला. व खात्री झाली की शोधण्यासाठी ठिकाण योग्य निवडले. हळू हळू योगेश खाली जाऊ लागले तिनशे फुट खाली गेल्यावर थोडा कुजट वास आला. व खाली अजून साठ सत्तर फुट मृतदेह सदृश काही तरी नजरेस पडले मग अजून खाली जाऊन खात्री केली व मृतदेह सापडला आहे असा निरोप दिला. म्हणजे एकुण ३७० फुटांपेक्षा जास्त खोल मृतदेह आढळला होता. आदित्य पिलाने व रोहित वर्तक यां दोघांना इतर साहित्य घेऊन मदतीसाठी खाली यायला सांगितले. तशी साहित्याची तयारी केली . मृतदेह पॅकींग साठी स्ट्रेचर व इतर ग्लोब्ज साहित्य घेऊन सुरक्षासाधनासह दोघे एका मागोमाग एक खाली गेले. वॉकी वर अपडेट चालू होते. सुचना चालू होत्या वर करण वरे ,सागर कुंभार यांनी सिनीअर च्या सल्याने सेट अप रेडी केला व खालची टीम व वरची टीम यांनी एकमेकाशी संवाद साधून मृतदेह हळूहळू वर खेचायला सुरुवात केली. अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी टीमचे सर्वेसर्वा गुरु सर सहकार्यांबरोबर मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले होते. दोन्ही टीमने मिळून मृतदेह दुपारी साडेबारा वाजता वर घेतला व पुढील कारवाईसाठी पोलीस व नातेवाईकांना सूपूर्त केला.मोहिमेत टिम मध्ये योगेश उंबरे,रोहीत वर्तक,आदित्य पिलाने,राजेंद्र कडू,महेश मसणे,सुनिल गायकवाड,आनंद गावडे,अनिल सुतार,कपिल दळवी,करण वरे,सांगर कुंभार,सागर दळवी,दिनेश पवार,शिवराज गायकवाड,प्रिंस बैठा,समिर देशमुख,सहभागी झाले होते.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था खोपोली गुरुनाथ साठेलकर ,महेश भोसले,धर्मा पाटील या सर्व टिमने कमी वेळात रिकवरी ऑपरेशन पुर्ण केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page