सुक्ष्मयोग फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य महोत्सवाचा यशस्वी समारोप



मावळ मराठा न्युज -लोणावळा,सुक्ष्मयोग फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च ते ८ मार्च दरम्यान महिला आरोग्य महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी विविध उपक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.या आठवडाभर चाललेल्या महोत्सवात आहार आणि आयुर्वेदावरील विशेष मार्गदर्शन सत्रे, हिप्नोथेरपी सत्र, तसेच झुंबा सत्राचे आयोजन करण्यात आले. महिलांनी या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारोप कार्यक्रमात लोणावळ्याच्या अध्यक्षा सौ. सुरेखा ताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार समारंभ देखील पार पडला.या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष पदम गुप्ता, कविता नय्यर, सारिका अगरवाल आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच सुख्ष्म योग फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज शर्मा व त्यांची टीम शिवम, अनीता आणि विप्रा यांनी या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.महिला आरोग्य महोत्सव २०२५ हा महिलांसाठी सशक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही होणे गरजेचे आहे, असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.




