मावळ मतदारसंघामध्ये महायुतीतील संघर्ष शिगेला,राष्ट्रवादीत बापू भेगडे तर भाजपातून माजी मंत्री बाळा भेगडे,रवींद्र भेगडे यांचे आव्हान



मावळ मराठा न्युज :- विद्यमान आमदार सुनील शेळकेंयांच्या पुढे स्वपक्षासह भाजपचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.विधानसभा निवडणुक जशी जशी जवळ येऊ लागली तस तसें थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा आणि मावळ परिसर तापू लागला आहे. मावळ मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यापुढे स्वपक्षासह भाजपनेही आमदारांची दादागिरी मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी आमदार शेळकेंना थेट आव्हान दिले आहे. त्यातच भाजपनेही या जागेवर दावा सांगत बाळा भेगडे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचीमुंबईला भेट घेतली आहे. भाजपने राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आमदार शेळकेंसाठी विधानसभेची वाट अत्यंत अवघड होताना दिसते आहे. मुळात राजकारणात पूर्वीसारखी नैतिकता राहिली नाही,वरच्या पातळीवरचे नेते आपल्या सोयीचे राजकारण करतात आणि कार्यकर्त्याचा हातात फक्त त्यांचा डोंबारी चा खेळ पाहण्यापलीकडे काहीच नसते हे वारंवार घडते आहे. बापू भेगडे समर्थक यांचेकडून विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या मला एकदाच संधी द्या या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे. एकदा दिली संधी आता बापूला द्या लबाड लांडगा असे म्हणून संबोधले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी लोकसभेला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला विरोध केला होता.खासदारबारणे यांनी देखील आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता टीका केली होती हे मावळातील सर्व मतदारांनी पाहिले आहे. तेव्हाच महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजली होती. आता विधानसभेवेळी खुद्द शेळकेंनाच महायुतीतून आव्हान उभे राहिल्याने उमेदवारीसाठी संघर्ष शिगेला पोहचला आहे. येत्या एकदोन दिवसात चित्र स्पष्ट होइल.मागील निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजपचे उमेदवार माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ७२ हजार हुन अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात शेळके आणि भेगडे यांच्यात वादाच्या ठिणग्या सतत पडत राहिल्या.विद्यमान आमदार पाच वर्षे त्यांनी मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांचीही नाराजी ओढवून घेतली आहे. आमदार शेळकेंनी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी फारकत घेत केलेल्या राजकीय कुरघोड्या, स्वपक्षीय नेत्यांवर ठेवलेला दबाव, त्यांना विश्वासात न घेता केलेले राजकारण, गेल्या पाच वर्षांमध्ये मावळ परिसरातील विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रियेमध्ये झालेली रिंग,त्यातील टक्केवारी,यामुळे विरोधकांची संख्या वाढली आहे.मावळच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेठी निर्णय घेतील. मी कोणाकडेही उमेदवारी मागितलेली नाही. कोणत्याही नेत्यांना भेटलेलो नाही. माझ्याप्रमाणे अन्य लोकही उमेदवारीसाठी इच्छुक असतील. इच्छुक असणे यात वावगे काहीही नाही. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार उभा करतील, त्याचे आम्ही सर्वजण काम करणार आहोत असे मावळचे आमदार सुनील शेळके सांगत आहेत.महायुतीत राष्ट्रवादी सामील झाल्यापासून आमदार शेळके यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध सुरू आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी जाहीरपणे तोफ डागली आहे. आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही शेळकेंना विरोध करत उमेदवारीवर दावा केला आहे. बापूसाहेब भेगडे यांनी राष्ट्रवादीकडून मिळत असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद देखील नाकारले आहे. पक्षाचे तिकीट द्या असे बापू भेगडे यांचे म्हणणे आहे.महाविकास आघाडी किंवा सर्वपक्षीय अपक्ष उमेदवारावर एकमत होणार का? याबाबत चाचपणी सुरु आहे. मावळमध्ये शेळके यांच्यामुळे महायुतीतील घटक पक्षांत अस्वस्थता आहे. तळेगावातील भेगडे परिवाराचे या राजकारणावर वर्चस्व असून आहे. त्यातूनच शेळकेंना मोठा विरोध होत आहे. शेळकेंना पाणी घरचा रस्ता दाखवण्यासाठी सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू असून, सर्वच विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.घोडा मैदान दूर नाही एकदोन दिवसात मावळ विधानसभेचे चित्र स्पष्ट होइल.




