वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे वतीने संविधान दिनानिमित्त ॲड डॉ सुधाकर आव्हाड यांचे व्याख्यान संपन्न



मावळ मराठा न्युज – वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे वतीने संविधान दिनानिमित्त ॲड डॉ सुधाकर आव्हाड यांचे संविधान कसे तयार झाले, संविधान टीकविणेचा सर्वोच्च न्यायालय तसेच संसदेमधील संघर्ष या विषयावर नुकतेच वडगांव मावळ कोर्टात व्याख्यान झाले. त्यावेळीं संविधान तयार करणेकामी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, जस्टीस बी एन राव तसेच इतर मान्यवरांचा कसा सहभाग होता यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जुन्या हस्तलिखित संविधानाची प्रत जे प्रेम बिहारी यांनी लिहिले आहे व त्याच्या प्रत्येक पानावर त्यांची सही आहे व शेवटचे पानावर त्यांचे आजोबांचे नावाचा उल्लेख आहे त्याचा इतिहास देखील सांगितला . जुन्या हस्तलिखित संविधान मध्ये भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री रामचंद्र,भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, डॉ सुभाषचंद्र बोस यांचे फोटो व उल्लेख देखील आहेत.जुन्या हस्त लिखित संविधानाची मूळ प्रत देखील त्यांनी संघटनेकडे व मे. अति जिल्हा न्यााया धीश सो यांचे कडे सुपूर्द केली. सन १९५० ते १९८० मध्ये केंद्रामध्ये विविध सरकारे आली. व सरकारला सोयीचे कायदे ९ व्या शेडूल्ड मध्ये टाकून संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा प्रयत्न कसा केला गेला . पण केशवांनंद भारती १९७३ , तसेच मिनरव्हा मिल्स १९७६ या सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णयाने संविधानाचा मूळ गाभा कोणीही बदलू शकत नाही हे अधोरेखित केले. तसेच संसदेला कायदे करणेचे एक मर्यादेपर्यंत अधीकार आहेत असे अधोरेखित केले.जर संसदेने चुकीचे कायदे केलें तर त्यात संविधानाच्या तरतुदीनुसार हस्तक्षेप करणेचा देखिल अधीकार सुप्रीम कोर्टाला आहे असे नमूद केलें. जोपर्यंत सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत संविधान राहील असा विश्वासही ॲड डॉ सुधाकर आव्हाड यांनी व्यक्त केला. वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे वतीने ऍड डॉ सुधाकरराव आव्हाड यांचा सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सो डी के अनभूले सो हे होतें. सहन्यायाधीश श्रीमती.एस ए माळी सो, सहन्यायाधिश श्री .एस.पी.जाधव सो, मुंबई उच्च न्यायालय सरकारी वकील ॲड विनोद चाटे,वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, ॲड दीपक चौधरी,ॲड एस एम मोरे ॲड धनंजय कोद्रे, ॲड विठ्ठल पिंपळे,सचिव ऍड अक्षय रौधल, ॲड. राम शहाणे, ॲड स्नेहा परदेशी, ॲड एन के गाडे, ॲड सुभाष देसाई,ॲड. मच्छिंद्र पंडित, ॲड अनुराधा शिकारे,ॲड रेश्मा घोजगे, ॲड शीतल कांबळे,ॲड. किरण बिनगुडे आदी वकील बंधु भगिनी,पक्षकार,मोठया संख्येने उपस्थित होते.




