भारतीय जनता पार्टी,लोणावळा याच्या वतीने १२ एप्रिल सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले अमूल्य योगदान देत ‘अंदमान’ येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे, ज्यांच्या प्रेरणेमुळे हजारो युवकांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्नीकुंडांत आपले बलीदान दिले असे थोर क्रांतीकारक व प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ यांच्या भव्य ‘गौरव यात्रेचे’ लोणावळ्यातील सर्व देशभक्त नागरिकांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.वेळ – बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:३०वाजता.यात्रेची सुरवात – छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट तेयात्रेचा समारोप – सावरकर पुतळा, लोहगड उद्यानतरी सर्व सावरकर प्रेमी व राष्ट्रभक्त नागरिकांनी’ या स्वा.सावरकर गौरव यात्रेत सहकुटुंब व मित्र परिवारासहित सहभागी व्हावे असे आवाहन यात्रेचे निमंत्रक श्री.रामविलास खंडेलवालअध्यक्ष,भाजपा लोणावळा,श्रीमती सुरेखाताई जाधव,मा.नगराध्यक्षा लोनपा ,श्री. श्रीधर जी पुजारी, मा.उपनगराध्यक्ष लोनपा श्री.देविदास कडू,मा.गटनेता लोनपा ,भारतीय जनता पार्टी,लोणावळा यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page