प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल -सुनील शेळके



मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,लोणावळा शहरामध्ये शनिवारी पोलीस प्रशासनाकडून सर्व परवानगी घेऊन माझी जनसंवाद यात्रा सुरू होती.भांगरवाडी या ठिकाणी असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये मी दर्शनासाठी गेलो म्हणून माझ्यावर विरोधकांनी गुन्हा दाखल केला. जाणीवपूर्वक ते लोक त्या ठिकाणी थांबून राहिले होते. चार वाजता माझी जनसंवाद यात्रा भांगरवाडी या ठिकाणी आली. मंदिराच्या बाहेर विरोधी पक्षाचे काही लोक थांबलेले होते. म्हणून आम्ही मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने गेलो, जवळपास दीड तास तिथे थांबलो तरी सुद्धा हे लोक मंदिरापासून जायला तयार नव्हते. जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने आम्हाला त्याच मार्गाने यावे लागले. जन संवाद यात्रेत आम्ही सर्व देवदेवतांचे मंदिरात जाऊन दर्शन घेत होतो. भांगरवाडी येथे आल्यानंतर आम्ही प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलो व दर्शन घेऊन बाहेर आलो. त्यानंतर विरोधी गटांनी स्टंटबाजी करत माझ्या विरोधात ठिय्या आंदोलन करत, मंदिरात का आले असे म्हणत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गुन्हा दखल होणार असेल तर होऊ द्या. असे किती गुन्हे ते माझ्यावर दाखल करणार माहित नाही. मात्र मावळ तालुक्यामध्ये सर्वत्र विरोधकांकडून रडीचा डाव सुरू असल्याचा हल्लाबोल आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवर केला आहे. आमदार शेळके म्हणाले, संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये व लोणावळा शहरामध्ये जनसंवाद यात्रेला प्रत्येक विभागांमध्ये व गावांमध्ये मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे याकरिता खोटे-नाट्य आरोप करणे कुठे गुन्हे दाखल करणे असे प्रकार विरोधकांकडून सुरू आहे.




