फुले दांपत्यांनी दिला चुकीच्या रूढी परंपरांना छेद,सत्यशोधक चित्रपटातील कलाकारांचा सत्कारप्रसंगी अक्षय कळमकर यांचे वक्त्यव्य

मावळ मराठा न्युज :-चिंचवड (प्रतिनिधी) महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवनचरित्र तसेच त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत. असे आवाहन करीत फुले दांपत्यांनी चुकीच्या रुढी परंपरांना छेद दिला.असे उदगार वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय कळमकर यांनी काढले. चिंचवड आयनाॅक्स येथे सत्यशोधक चित्रपटातील कलाकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.या चित्रपटाचे निर्माते आप्पासाहेब बोराटे,प्रविण तायडे,बाळासाहेब बांगर,चित्रपटाचे कलाकार प्रविण तायडे,आयोजक अक्षय कळमकर,महात्मा जोतीबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी व त्यांचे मंडळातील सहकारी तसेच ह.भ.प शेखरमहाराज जांभुळकर,ह.भ.प महादेव महाराज भुजबळ,आनंद जेष्ठ नागरीक संघ वाकड आणि अक्षयदादा कळमकर मित्र परीवार उपस्थित होते.वाकड तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील २२५ बंधूभगिनिंना अक्षयदादा कळमकर मित्र परीवाराच्या वतीने नागरीकांना सत्यशोधक चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला. ’महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्राबाई फुले यांनी समाजातील चुकीच्या परंपरांना झुगारुन समाजाच्या रोषाला न घाबरता आपले आयुष्य तळागाळाती लोकांच्या कल्याणासाठी कसे खर्च केले हा त्यांचा संघर्षमय प्रवास जर जाणुन घ्यायचा असेल तर हा चित्रपट सर्वांनी जरुर पहावा असे आवाहन अक्षय कळमकर यांनी केले.शेखर जांभूळकर आणि महादेव भुजबळ यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page