शिवसेना उबाठा लोणावळा शहरच्या वतीने प्रलंबित कामासंदर्भात लोनप मुख्याधिकारीना आंदोलनाचा इशारा


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे सुशोभीकरणाचे रखडलेले काम कधी सुरू होणार,तसेच भांगरवाडी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम का थांबले ते देखील लवकरात लवकर सुरू कधी होणार याचा जाब विचारण्यासाठी व ईतर प्रशनांवर देखील आज लोणावळा नगरपरीषदेचे मुख्यधिकारी श्री.अशोकजी साबळे साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना लोणावळा शहराच्यावतीने प्रशासनाकडे अनेकदा वेळोवेळी निवेदने देण्यात आली.त्याचे कोणतेही ठोस असे उत्तर मिळालेले नाही व आज पुन्हा त्यांच्याकडे लेखी स्वरूपात मागनी करण्यात आली.यावेळी मुख्यधिकारी यांनी आश्वासन दिले कि येत्या दोन दिवसात दोन्ही कामाची काय स्थिती आहे ती लेखी स्वरूपात कळविण्यात येईल असे आश्वासन मुख्यधिकारी यांनी दिले.जर का लवकरात लवकर कामाची सुरूवात नाही केली तर शिवसेना लोणावळा शहराच्यावतीने लोणावळा नगरपरीषदेच्या विरोधात तिव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.यावेळी शिवसेना महिला पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विरोधी पक्षनेत्या श्रीमती शादानभाभी चौधरी,शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले,शहरप्रमुख- बाळासाहेब फाटक,मा.नगरसेवक शिवदास पिल्ले,शिव वहातुकसेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, उपशहरप्रमुख प्रविण काळे,मनेष पवार,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे,खंडाळा विभाग संघटक परेश बडेकर,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,धिरज घारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




