जनतेच्या सेवेसाठी हॉस्पिटल,डॉ बाबासाहेब प्रेमी जनतेची अपार श्रद्धा असलेला पुतळा,दोन्ही महत्वाचे,इगो बाजूला ठेवून चर्चेतून मार्ग काढता येईल- नागरिकांच्या प्रतिक्रिया


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा येथील दिक्षाभूमी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो कित्येक वर्षा पासून तेथे अस्तित्वात आहे. त्या परिसरातील जागा देखील तेवढीच आहे. तरीसुद्धा पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम बंद पाडून दोन समाजात विष पेरण्याचे काम करून बेशर्मीची हद्द पार केली अशी आंबेडकरवादी जनतेची भावना झाली आहे. मावळ चे आमदार सुनील शेळके गरीब जनतेला फक्त १ रुपयात लाखो रुपयांची शस्रक्रिया करणार असल्याचे जरी खरे असले तरी रुग्णालयचे बांधकाम करताना याचा विचार का केला नाही? ही जर चूक केली असेल तर याबाबत आंबेडकरी जनतेशी चर्चा,सल्ला मसलत करून त्यातुन मार्ग काढता आला असता आणि सर्वांचे समाधान झाले असते.मावळचे आमदार सुनिल शेळके आणि लोणावळा नगर पालिकेचे प्रशासक अशोक साबळे यांनी भारतरत्नं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या बाबतच्या द्वेषामुळे अखेर पुतळ्याचे काम बंद पाडून काय साध्य केले आहे हे सर्व जनतेला कळावे ही अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. १०० खाटीचे रुग्णालयचे काम चालू होते तेव्हा आमदार सुनील शेळके आणि पालिका प्रशासन काय करत होते याचे सुद्धा उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यासाठी सर्व प्रकारच्या एन ओसी असताना अधिकृत रीत्या गेली दिड वर्ष काम चालू आहे .बाबासाहेब डहाणूकर हॉस्पीटल बांधताना त्याची एकूण खाटांची संख्या .रहीवासी डॉक्टर्स,नर्सेस , स्टाप . यांची संख्या तसेच त्यांच्या व पेशंटला भेटण्यास येणा-या लोकांच्या गाडी पार्कींगची व्यवस्था तसेच अँबूलेंन्स पार्कींग कुठे व कशी असावी? हे हॉस्पीटलचा प्लान बनविताना लोनावळा नगरपालीकाने व आर्किटेक्टने विचारात का घेतल नाही? . या वर नक्कीच प्रश्न निर्माण होतो. पार्कींगचा प्रश्न गेली दिड वर्ष पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम चालू आहे तेंव्हा कुठलीच समस्या निर्माण झाली नाही आणि काम चालू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या ह्या सुद्धा मिळालेल्या आहेत .मग असे अचानक काहीतरी कारण सांगून काम का बंद केले ? याचा अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी असलेला द्वेश तर नसावा ना असे असंख्य प्रश्न आंबेडकरी जनता आणि बाबासाहेब यांचेवर प्रेम करणाऱ्या मध्ये आहे .




