वाकसई,कार्ला,वेहेरगाव या पंचक्रोशी मध्ये आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ विधानसभेचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, लोक जनशक्ती पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वाकसई व कार्ला परिसरामधील गावांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. गावोगावी नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे जोरदार स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करत आमदार सुनील शेळके यांना विजयाचा विश्वास दिला. तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा उत्स्फूर्त असा सहभाग या जनसंवाद यात्रेत पाहायला मिळाला. मुंढावरे गावांमधून या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. पुढे फांगणे वसाहत, टाकवे, शिलाटणे, दहिवली, वेहेरगाव, कार्ला, सदापूर, वरसोली, वाकसई चाळ, वाकसई गाव, देवघर, करंडोली, जेवरेवाडी या गावांमध्ये सोमवारी ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आई एकविरा देवीच्या मंदिर परिसराचा व कार्ला लेणी चा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी दिला आहे. मागील पंधरा ते वीस वर्षापासून ची मागणी असलेला कार्ला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पूल याचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. वाकसई फाटा ते जेवरेवाडी हा मागील अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या रस्त्याचे संपूर्णपणे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कार्ला वाकसई प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. यासह विविध गावांमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या निधीमधून विकास कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांमुळे आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उभे असल्याचे चित्र या जनसंवाद यात्रेच्या निमित्त पाहायला मिळाले. आमदार सुनील शेळके यांचे स्वागत करण्यासाठी ते गावामध्ये महिला भगिनी मुली तरुण मुले ज्येष्ठ नागरिक हे आतुरतेने थांबत असल्याचे चित्र दिसून आले. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची ही पोच पावती असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर प्रत्येक गावात निधी देताना जातीपातीचा व पक्षाचा विचार न करता विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवत निधी देण्याचे काम केले. येणाऱ्या काळामध्ये आई एकवीरा देवीच्या पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत या सर्व परिसरातील गावांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेमध्ये एक मोठा प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेवणारे लोहगड, विसापूर हे किल्ले तसेच भाजे लेणी, कार्ला लेणी या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत त्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देत या भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. अनेक गावांमधील छोटी मोठी कामे आजही प्रलंबित आहेत, त्या कामांना येत्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देत ही सर्व गावे भौतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा मानस असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना सर्व नागरिकांना सांगितले. विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. माझे स्टेटस ठेवू नका, माझ्या पोस्ट टाकू नका अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला सुनील शेळके तुम्ही कसा बाहेर काढणार. मायबाप जनतेला धमक्या देऊन नाही तर प्रेमाने आत्मसात करत त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करणारा लोकप्रतिनिधी हवाय म्हणूनही जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. ज्यावेळी या सर्वसामान्य जनतेला तुमच्या आधाराची गरज होती त्यावेळी तुम्ही मी व माझे कुटुंब म्हणत घरामध्ये लपून बसला होता. हे जनता कधीही विसरणार नाही असे सुनील शेळके यावेळी म्हणाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page