रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने सावित्रीच्या लेकींना १० सायकलीचे मोफत वाटप










मावळ मराठा न्युज -लोणावळा,रोटरीक्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळ्यातील व्ही पी एस शाळा १ डॉ. बी एन पुरंदरे ४ आणि लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय येथील गरीब गरजू मुलींना ५ अश्या एकूण १० सायकलिंचे मोफत वाटप प्रमुख पाहुणे आणि ५ सायकली चे देणगीदार रोटरी क्लब ऑफ पुणे चे माजी अध्यक्ष रोटेरियन कैलास मोंगा, रो .प्रेसिडेंट रोहित मित्रा रोटरी क्लब ऑफ पुणे.हिंदुजा गुल.शर्मिला अतुल पारेख,तसेच मित्रा व शर्मिला यांनी दोन सायकली पुरस्कृत केल्या.व त्यांचे मोफत वाटप लोणावळा येथील जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुला केंद्रात करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा श्रीमती मृदुला पाटील, उपाध्यक्ष श्री रविंद्र कुलकर्णी, सत्यनारायण अगरवाल, जेष्ठ नागरिक संघाच्या सेक्रेटरी शारदा अगरवाल,कोशाध्यक्षा श्री संध्या गव्हले,उप कोषाध्यक्ष भगवती प्रसाद, सामाजिक कार्यकर्ते सातपुते, पत्रकार श्रीराम कुमठेकर, साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्यसंपादक अँड.संजय पाटील,मुलींचे पालक आणि शिक्षणासाठी १० ते १२ किलोमीटर पायपीट करणाऱ्या सावित्रीच्या लेकी आवर्जून उपस्थित होत्या.
रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षा,सौ विजया कल्याण यांच्या या महत्वाकांशी प्रकल्प म्हणजे सायकली वाटप झाल्यावर सावित्रीच्या लेकींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी आय्.टी.डायरेक्टर रो.नितिन कल्याण, प्रोजेक्ट डायरेक्टर रो.नारायण शारवाले, इमेज व पब्लिसिटी डायरेक्टर रो.रविंद्र कुलकर्णी,रो.पुंडलिक वानखेडे, सेक्रेटरी रोमुस्तफा कोंट्राक्टर, खजिनदार दूरैय्या रामपूवाला,२६-२७च्या अध्यक्षा मोनाली कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून झाली.त्यानंतर पाहुण्यांचा वउपस्थित जेष्ठ नागरिक पदाधिकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.रो.मोंगा,रो.रविंद्र कुलकर्णी,रो.मोनाली कुलकर्णी ,रो.आशिश मेहता मृदुला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षा विजया कल्याण यांनी आभारप्रदर्शन केले. रो.नितीन कल्याण व रो.नारायण शारवाले यांनी सदर प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रो.रविंद्र कुलकर्णी यांनी केले.



