गांजा बाळगणाऱ्या इसमास कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले; १.११ किलो गांजासह एकूण ₹६५,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त






मावळ मराठा न्युज -कामशेत दि. २८/०९/२०२६ रोजी कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी आकाश पवार* यांच्या मार्गदर्शनाखाली *पोलीस उपनिरीक्षक केसरकर व पथक* पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना मौजे चिखलसे, ता. मावळ, जि. पुणे गावच्या हद्दीत कामशेत ते पवनानगर रोडलगत असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला.त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १ किलो ११० ग्रॅम (१११० ग्रॅम) गांजा, किंमत ₹५५,५००/-, तसेच OPPO कंपनीचा मोबाईल फोन, किंमत अंदाजे ₹१०,०००/-, असा एकूण ₹६५,५००/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला.सदर इसमाचे नाव सचिन भगवान पवार, वय ३७ वर्षे, रा. पवना चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे असे असून, त्याच्याविरुद्ध कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं. २०७/२०२६, गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम ८(क), २०(ब), ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री संदीपसिंह गिल्ल सो, मा अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार सो तसेच मा SDPO श्री गजानन टोंपे सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी श्री आकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, सहाय्यक फौजदार जितेंद्र कदम, पोलीस हवालदार दुर्गा जाधव, पोलीस हवालदार आशिष झगडे, पोलीस हवालदार रवींद्र राय, पोलीस हवालदार जितेंद्र दीक्षित, पोलीस शिपाई रवींद्र राऊळ, पोलीस शिपाई मंगेश मार्कड,पोलीस शिपाई महेश थोरात, पोलीस शिपाई गणेश ठाकूर, पोलीस शिपाई धनाजी मोटे, पोलीस शिपाई सौरभ गायकवाड यांचे पथकाकडून करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्याकडून अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक व बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.



