भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीच्या दावणीला बांधल्याचा संतोष दाभाडे यांचा आरोप



मावळ मराठा न्युज :-तळेगाव दाभाडे,मावळ तालुक्यात भाजप पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणारा एकही नेता राहिला नाही का अशा शब्दात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्यांची तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सुनावले आहे स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी भाजपा पक्ष हा महाविकास आघाडीच्या दावणीला बांधण्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर भाजपा पक्ष संपवण्याचा आरोप काही पक्ष पदाचे राजीनामे दिलेले नेते करत आहेत. याविषयी बोलताना संतोष दाभाडे म्हणाले, याच नेत्यांना पक्षाने मावळ तालुक्यात सर्व काही दिले मात्र तरी देखील त्यांची हाव गेलेली नाही. मावळ तालुक्यातील भाजपच्या अवस्थेची खापर हे आमदार सुनील शेळके यांच्यावर फोडले जात आहे मात्र वास्तविक पाहता भाजपा पक्ष संपवण्याची काम या नेतेमंडळींनीच केले आहे. मावळ तालुक्यामध्ये भाजपाला गत वैभव प्राप्त करून देणारा एकही देता शिल्लक राहिला नाही का ? अशा शब्दात भाजपच्या नेतेमंडळाची कान उघडणी करत केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष महाविकास आघाडीच्या दावणीला बांधत असल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे. काही नेत्यांच्या अकार्यक्षमतेपणामुळे मावळ तालुक्यात भाजपला उतरती कळायला लागली आहे मात्र स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यावर बेछूट आरोप सुरू आहेत. मागील पाच वर्षांमध्ये मावळ तालुक्यात भाजप वाचवण्यासाठी व वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले त्याचा जाहीर खुलासा या मंडळींनी करावा असे आव्हान देखील त्यांना केले आहे. भाजपमध्ये रवींद्र भेगडे यांच्यासारखे उमदे नेतृत्व असताना त्याला पाठिंबा देण्याऐवजी त्याचे पंख छाटत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणारे भाजपा पक्ष कसे वाचवणार असा प्रश्न संतोष दाभाडे यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे देशाचे नेते नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना निवडून येण्याचा आशीर्वाद दिला आहे तर महाराष्ट्रातील नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे असे दाभाडे यांनी सांगितले.निष्ठावंतांमधून सक्षम नेतृत्व पुढे येईल आज पर्यंत भाजपाने ज्यांना सर्व काही दिले त्यांनी पक्ष पदाचे राजीनामे देत, पक्ष फोडण्याचे काम केले. पक्ष विरोधी भूमिका घेतली आहे. आज देखील भाजप पक्षामध्ये अनेक निष्ठावंत आहेत व त्यामधून सक्षम नेतृत्व पुढे येईल व या मावळ तालुक्यामध्ये भाजपा पुन्हा मोठ्या जोमाने काम करेल व पक्षाला गत वैभव प्राप्त करून देतील असा विश्वास भाजपाचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी व्यक्त केला आहे




