समाजसेवेच्या तेजस्वी कार्याला मानाचा मुजरा लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा चा जिल्हास्तरीय बहुमान








पुणे येथे दि. २ व ३ मे रोजी सिम्बायोसिस सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या Lions District Conference मध्ये Lions Club of Lonavala Khandala ने विविध मानाचे पुरस्कार पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.दि. ३ मे रोजी झालेल्या सन्मान सोहळ्यात जिल्हा प्रमुख Rajesh Agrawal यांच्या हस्ते क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल यांना “जिल्ह्यातील उत्कृष्ट क्लब” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, सेवाभावी उपक्रम व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.तसेच एमजेएफ लायन देवल पारेख यांना “उत्कृष्ट विभाग प्रमुख” पुरस्कार, तर लायन विरल गाला यांना “उत्कृष्ट कार्यकारी अधिकारी” पुरस्काराने गौरविण्यात आले.परिषदेत सादर करण्यात आलेल्या कार्यनोंद (scrap book)वहीस संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, तिची बहुस्तरीय परिषदेसाठी (Multiple conference)निवड करण्यात आली आहे. ही बाब क्लबसाठी अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.या प्रसंगी अध्यक्षा लायन कांता ओसवाल, सचिव लायन निराली नालेकर, एमजेएफ देवल पारेख, डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल, देवेंद्र नालेकर व रोहित थोरात उपस्थित होते.



