वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय,बिबवेवाडी,पुणे व संलग्न सेवा दवाखाना लोणावळा येथे विमा कामगारांकरिता नोंदणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा,मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र रा.का.वि. सोसायटी, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच डेला ॲडवेंचर चे प्रमुख जिमी मिस्त्री यांच्या सहकार्याने वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, बिबवेवाडी पुणे व संलग्न सेवा दवाखाना लोणावळा यांनी, दिनांक 25 /08 /2025 व 26/08/2025 रोजी डेला रिसॉर्ट, लोणावळा येथे विमा कामगारांकरिता नोंदणी व आरोग्य शिबिर आयोजित केले होते. ESI योजनेबद्दल विमा कामगारांना जास्तीत जास्त माहिती मिळावी व त्यांना विमा योजनेकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता यावा हा या शिबिराचा उद्देश आहे. या दोन दिवसीय शिबिरांमध्ये 409 ओपीडी (आरोग्य तपासणी) व 397 नवीन कामगाराची नोंदणी करण्यात आली. सदर शिबिरामध्ये विमा कामगारांची उच्च रक्तदाब ,मधुमेह, रक्तक्षय तसेच इतर लॅब तपासणी करून गरजूंना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले . तसेच ESI बद्दलची माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.सदर शिबीर वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बाळकृष्ण रंगदळ , वैद्यकीय अधिकारी डॉ. तनुजा गवार्ले यांच्या निर्देशानुसार श्री. बालाजी शिंदे, डॉ. सच्चिदानंद दासरे, डॉ.ऋत्विक जगताप, लोणावळा ब्रँच मॅनेजर अनुराधा, लोणावळा दवाखान्यातील श्री. सागर चव्हाण व दवाखान्यातील इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न झाले.

विमाधारकांना विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत तपासणी ,मोफत औषधोपचार ,सेकंडरी केअर सुविधा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती तसेच इतर सर्व सुविधांची माहिती सांगण्यात आली. सदर शिबिराचे आयोजन डेला मॅनेजमेंट टीम, HR टीम यांनी अतिशय उत्तम नियोजन करून कामगारांसाठी शिबिर यशस्वी केले आहे.भविष्यात विमा कामगारांसाठी अशा प्रकारचे अनेक शिबिरे आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त विमा कामगारांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच सर्व कंपन्यांनी शिबिरासाठी वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, बिबेवाडी, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page