सिंधू जाधव प्रकाशित “अंतर्नाद लोणावळा”शहराच्या अंतरंग उलगडणाऱ्या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन, आरटी चौधरी यांनी दिल्या शुभेच्छा

मावळ मराठा न्युज – सिंधू जाधव यांनी त्यांच्या पहिल्या हुंकार या कविता संग्रहाचे प्रकाशन यापूर्वी केले आहे. एक कवयित्री म्हणून त्यांची ओळख लोणावळ्याला होतीच. नुकताच त्यांचा अंतर्नाद लोणावळा या प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका नाईक, लोणावळ्यातील वस्तू विशारद व इतिहास अभ्यासक आनंद नाईक, अखिल भारतीय नवोदित साहित्य परिषद पुणे च्या उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा संगीता लंघे, लेखिका सिंधू जाधव यांच्यासह प्रकाश रणधीर, नवनाथ लेंडघर, रमेश बोंद्रे, सुनील यादव, संजय आडसुळे, गिरीश पारेख, नितीन कल्याण, विजया कल्याण, उमा मेहता, आरोही तळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.लोणावळा शहराचे अंतरंग उलगडणाऱ्या अंतर्नाद लोणावळा या पुस्तकाचे प्रकाशन वसंत पंचमीच्या दिवशी अगदी दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. लोणावळ्यातील कवयित्री व लेखिका सिंधू जाधव यांनी हे पुस्तक संपादित केले असून त्यांच्या सिंधू आर्ट प्रकाशन येथून ते प्रकाशित करण्यात आले आहे.लोणावळा शहरातील विविध जुन्या गोष्टींना या पुस्तकामधून उजाळा देण्यात आला आहे. विविध विषयांवर लोणावळा व परिसरातील लेखकांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत. लोणावळा शहराचे अंतरंग समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. लेखकांनी देखील त्याच दृष्टिकोनातून यामध्ये नानाविध लेख लिहिले आहेत व संपादकांनी अतिशय उत्तमरीत्या ते संपादित करून वाचकांसाठी शब्दबद्ध केले आहेत. अंतर्नाद लोणावळा हा पहिलाच अंक प्रकाशित करण्यात आला आहे. दरवर्षी लोणावळा व मावळ भागाचे विविध पैलू उलगडणारे अंक प्रकाशित केले जाणार असल्याचे या प्रकाशन सोहळ्या दरम्यान संपादिका सिंधू जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ लेंडघर यांनी केले तर अनुप्रित यादव यांनी सूत्रसंचालन केले. सिंधू जाधव ही डॉ. बी. एन्. पुरंदरे बहुविध विद्यालय, लोणावळाची माजी विद्यार्थिनी. तिचा सर्वांनाच अभिमान आहे. तिचा शाळेशी, अन्य गुरुजनांशी संपर्क मात्र कायम आहे. तिच्या हुंकार या कविता संग्रहाचे प्रकाशन शाळेच्या सभागृहात झाले होते. एक कवयित्री म्हणून ती उदयास येत होती. तिला तिच्या आई- वडिलांचे पाठबळ मिळत होते. सिंधूने अनेक सत्य घटनांवर आधारित लघुकथा लिहल्या आहेत.ती एक लेखिका पण आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वच्या आणखी एका पैलूचा परिचय झाला. आर्टिस्ट, कवयित्री, लेखिका म्हणजे साहित्यिक, प्रकाशक, समाजसेविका अशा अनेक भूमिका ती पार पाडत आहे. ” सिंधू आर्ट प्रकाशन ” निर्मित “अंतर्नाद” लोणावळा, वर्षारंभ अंक पहिला या विशेषांकचा प्रकाशन सोहळा नुकताच दिमाखदार संपन्न संपन्न झाला. या सोहळ्याची सिंधूने मला आधीच कल्पना दिली होती. आठवणीने तिने मला निमंत्रणपत्रिका पण पाठविली आहे. फोनद्वारा संपर्क साधला. मी उपस्थित राहू शकत नाही याची मला खंत वाटते. संवेदनशील पण कणखर, समाजशील, मनमिळाऊ स्वभाव असलेल्या सिंधूचे डॉ बी एन पुरंदरे शाळेचे माजी मुख्याध्यापक आर टी चौधरी यांनी या संदेशांद्वारे मनापासून कौतुक,अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा दिल्या आहेत .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page