आनंद नागरिक संघात मकर संक्रात उत्साहात साजरी




मावळ मराठा न्युज -वाकड,पुणे,पोस्टल कॉलनीतील आनंद जेष्ठ नागरिक संघात दि २ फेब्रुवारीला मकर संक्रांत हा सण ओम साई सागर हॉटेलच्या बँकेट हॉल मध्ये सकाळी १० ते ३ या वेळेत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे तर प्रमुख पाहुण्या सौ स्वाती कलाटे होत्या.सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश बोरकर,उपाध्यक्ष मुरलीधर लहाने,माधव बह्राटे,अप्पा साहेब तेली यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम मासिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ह्या प्रसंगी हळदी कुंकू समारंभ तिळगुळ आणि प्लॅस्टिक ट्रे ही भेटवस्तू देऊन साजरा झाला.त्यात महिलांचा विविध गुणादर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यामध्ये समूहनृत्य,लोक नृत्य,कविता,कथा,भक्ती गीते,देशभक्ती गीते,उडती गाणीअशा विविध कार्यक्रमानी रंगत आणली.त्यात पुष्पा ढवळे यांनी सादर केलेले ‘दाताच दातवण’या लोकगीतावरील नृत्य आणि छाया निकुंभ यांनी गायलेले ‘बाई मी पतंग उडवीत होते’ बहारदार लावणी विशेष लक्षवेधी ठरल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजया चौधरी यांनी केले.कार्यक्रमामध्ये अलका कळमकर,चित्रा बह्राटे,मीरा बोरकर,हेमांगी बोंडे,हर्षा देसाई ,सुनीता सफई,किरण पोळ,विनया मुजुमदार, विभा दरेकर,प्रतिभा गावडे,वैशाली नेवले कविता कानडे यांनी सहभाग घेतला. याशिवाय हाऊजी आणि प्रश्नोत्तरे असे खेळ खेळून विजेत्या महिलांना पेनचे वाटप करण्यात आले.असे प्रसिद्धी विभाग प्रमुख अशोक बोंडे आणि हेमांगी बोंडे हे कळवितात.




