कान्हे येथे करुणाधाम या अनाथ मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन








मावळ मराठा न्युज – कान्हे,मावळ,दिनांक १२ एप्रिल २०२४ या दिवशी कान्हे येथे करुणाधाम या अनाथ मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. ‘मानव भविष्य निर्माण शिक्षण व संशोधन संस्था’ या संस्थेच्या संचालित ‘करुणाधाम’ हा प्रोजेक्ट अल्हाद बाळकृष्ण टपाले हे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेने अनाथ वंचित वीटभट्ट्यावरील बालमजूर त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये काम करणारे बाल मजूर यांना रेस्क्यू करून त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये उज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी उपाययोजना केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामशेत येथील डॉक्टर विकेश मुथा प्रसिद्ध उद्योजक अशोक गदिया, साथी#!zx फाउंडेशन देहूरोड येथील तांबोळी सर, उद्योजक आनंद टपाले, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट्स चेअर पर्सन मार्केटिंग ला. सुधीर जी कदम, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीनजी ओव्हाळ आणि त्यांची टीम, प्रसिद्ध वक्ते सागर जी वाघमारे, ऍड.नवीन वानखेडे इत्यादी या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी या मुलांना रेस्क्यू करून त्यांच्यासाठी त्यांचा आयुष्य मध्ये चांगले शिक्षण देऊन त्यांचा मजबूत पाया रचून त्यांना शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू करण्याचा या संस्थेचा मानस आहे. यावेळी विकेश मुथा यांनी सुद्धा संस्थेला भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या संस्थेची पूर्ण टीम पाहुणे आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल ओव्हाळ यांनी केले व आभार प्रदर्शन बाळकृष्ण टपाले यांनी केले. संस्थेला संस्थेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण टपाले साहेब यांनी ८ गुंठे जागा दान दिली आहे. आल्हाद टपाले यांचे आजोबा कालवश विठ्ठल टपाले यांची अंतिम ईच्छा होती की मावळ तालुक्यातील अनाथ, गरीब विद्यार्थ्यां साठी एक तरी मोफत शिक्षण देणारे वसतिगृह असावे, व तब्बल ३५ वर्षानंतर हे स्वप्न त्यांचा नातू पूर्ण करीत आहे.



