डॉ. विकेश मुथा यांना रोटरी चॅलेंजर्सचा धन्वंतरी पुरस्कार प्रदान

मावळ मराठा न्युज :- तळेगाव,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.विकेश मुथा यांना मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दर्पण महेशगौरी यांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक धन्वंतरी पुरस्कार नुकताच तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ड्रीम लंच होम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स हा जगातील पहिला दिव्यांग बांधवांचा क्लब नुकताच स्थापन झाला असून क्लबने पहिला उपक्रम डॉक्टर डे व सी.ए.डे थाटामाटात साजरा करुन समाजात एक नाविन्यपूर्ण संदेश निर्माण केला. आज पर्यंत विविध क्षेत्रातील ५४ पुरस्कार मिळाले परंतु दिव्यांग बांधवांच्या चॅलेंजर्स क्लबने दिलेला धन्वंतरी गौरव पुरस्कार हा मला नवीन चैतन्य आणि ऊर्जा देऊन गेला यापुढे अधिक काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मिळाली असल्याचे प्रतिपादन डॉ. विकेश मुथा यांनी करताना रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.तर रोटरी क्लब हा समाजातील गोरगरीब लोकांसाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करतो रोटरी चॅलेंजर्सच्या आपण सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी केले तर मायमर मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण जगातील या असामान्य क्लबला सर्वतोपरी सहकार्य करू असे अध्यक्षीय भाषणातून डॉ.दर्पण महेशगौरी यांनी विशद करताना सर्व पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या.आज पर्यंत समाजातून दिव्यांग बांधवांना मदत केली जाते परंतु हा क्लब स्थापन करून आम्ही समाजाला मदत करणार आहोत असे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या अध्यक्षा रो.ज्योती राजिवडे यांनी विशद करताना क्लब स्थापनेची उद्दिष्टे कथन केली.क्लब ॲडव्हायझर रो.संजय मेहता यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाचा हेतू व उद्देश विशद करताना उपक्रमाची माहिती कथन केली. क्लब ॲडव्हायझर रो.नितीन शहा यांनी धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ.विकेश मुथा यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे शब्दांकन व वाचन केले.डॉक्टर डे चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे मेंबर डॉ.सौरभ मेहता,डॉ.धनश्री काळे,डॉ. गणपत जाधव,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.उमेश गुट्टे यांना समारंभ पूर्वक सन्मानित केले तर सी.ए.डे चेऔचित्य साधून स्वानंद आगाशे,अमित कुमार,प्रसाद शिंदे यांना सन्मानित केले.सदर प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर रो.रवींद्र भावे,रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,सिटीचे अध्यक्ष रो. किरण ओसवाल,उपाध्यक्ष रो. भगवान शिंदे,माजी अध्यक्ष रो. सुरेश शेंडे,सिटीचे सेक्रेटरी सुरेश दाभाडे,सल्लागार सुरेश धोत्रे डायरेक्टर रो.रामनाथ कलावडे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी तीन नवीन सदस्यांना रोटरी सिटीचे उपाध्यक्ष रो.भगवान शिंदे व चालेंजर्सच्या अध्यक्षा रो.ज्योती राजेवडे यांच्या हस्ते पिनअप करण्यात आले. विशेष सहकार्याबद्दल खंडोबा स्टोन क्रशरचे मुख्य प्रवर्तक उद्योजक सतीश कलावडे व मीरा कलेक्शनच्या प्रवर्तक रो. स्वाती मुठे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी सिटीचे व रोटरी चॅलेंजर्सचे क्लब ट्रेनर रो. दिलीप पारेख यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रो.संदीप भोसलकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो.संग्राम जगताप,रो.तानाजी मराठे,रो.वासुदेव लखिमले, उद्योजक भरत राजवडे, रो. मधुरा लालगुडे, रो.प्रथमेश बनसोडे,रो.सुनील जाधव, रो. परशुराम माळी,रो.वैभव जायगुडे.रो निलेश घारे,रो. गणेश शेडगे.रो संपत लांडगे,रो. मनोज जैन,रो.गणेश देवडे,रो.उमा काशीकर,रो. स्वरांजली गायकवाड,रो.सुरेश भुटिया,रो.ऋषिकेश कारके,रो. गणेश घाडगे,रो.रोहिदास खांडभोर,रो.बेलाजी पात्रे,रो. रामदास गराडे,रो.रवींद्र खांदवे रो.प्रकाश चांदेकर इत्यादी डायरेक्टर्स व सर्व रोटरी चॅलेंजर्सच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page