वडगांव मावळ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी



मावळ मराठा न्युज -वडगांव मावळ,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे मुख्य न्यायाधीश आर.एन. चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवव्याख्याते ऍड . रवींद्र यादव यांचे ‘शिवकालीन न्यायव्यवस्था’ विषयावर व्याख्यान झाले. वडगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . संजय वांद्रे, उपाध्यक्ष ऍड. चंद्रकांत खांदवे, ऍड. सुधीर भोंगाडे, सरकारी वकील ठाकरे, ऍड. विकास नवघणे, ऍड. अमोल दाभाडे, ऍड. राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते. ऍड. देविदास मराठे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. अरविंद गोतारणे यांनी आभार मानले.




