लोणावळा नगरपरिषदेत रंगतोय पालिकेला टाळा ठोकणारे आमदार आणि तांत्रिक अडचणी सोडवणारे माजी लोकप्रतिनिधी यांच्यात कलगी तुरा



मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद निवडणुकांना अदयाप वेळ असताना त्या निवडणूकाची जणू ट्रायलच सुरु आहे. दोन पक्षात लोकसभा विधानसभा पासून गटबाजी झालेली आपल्याला दिसते. राष्ट्रवादीची दोन शक्कल, शिवसेनेची दोन शक्कल,भाजप चे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार केला तर काही भाजप निष्ठावंत यांनी महायुतीचा धर्म पाळला. तर मनसेमध्ये काही प्रमाणात दुरावा दिसला . थोडक्यात तालुका लेव्हलला आमदार सुनील शेळके यांना मानणारा एक मोठा गट आणि स्थानिक म्हणजेच लोणावळा शहर पातळीवर माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना मानणारा दुसरा गट असल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला काम करणं अवघड झाल्याचे सध्या चित्र दिसतंय. दोन दिवसापूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आढावा बैठक घेतली त्यात त्यांनी भांगरवाडी रेल्वे ब्रिजचे काम १० मार्चला सुरु न केल्यास लोणावळा नगरपरिषदेला टाळा ठोकण्याचा इशारा दिला आहे , तर सुरेखा जाधव यांनी शहरांमधील रखडलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासना सोबत माजी लोकप्रतिनिधी काम करत ही विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. तसेच लोणावळा शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लोणावळा नगरपरिषदमध्ये आढावा बैठक नुकतीच मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब जाधव,नासिर शेख,श्वेता वर्तक,आशिष बुटाला,राजू दळवी,योगिता कोकरे,जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे आदी मान्यवर व लोणावळा नगर परिषदेमधील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.प्रशासनाला मुख्य आणि तांत्रिक अडचण काय आहे ? हे समजून न घेता पालिकेला टाळे ठोकेन ही आमदार सुनील शेळके यांची भाषा शोभणारी नाही असे मत माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी मावळ मराठा न्यूजशी बोलताना सांगितले. पालिकेला सुनील शेळके यांचा गेल्या पाच वर्षात एक रुपया सुद्धा आमदार निधीतून आला नसल्याचे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा वाद सुरु होता त्याप्रसंगी सूर्यकांत वाघमारे यांनी केले होते. आमदार सुनील शेळके यांनी मागील पाच वर्षात लोणावळा शहराला किती आमदार निधी उपलब्ध करून दिला या प्रश्नाचे उत्तर देताना प्रशासनाने एकही रुपयाचा निधी दिला नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जो निधी लोणावळा शहराला मंजूर झाला आहे त्यापैकी जेमतेम निधी प्राप्त झाला असून मोठ्या प्रमाणात अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. डीपीडीसी मधून जो निधी उपलब्ध झाला आहे, त्याकरता लोणावळा नगरपरिषदेमधून प्रस्ताव गेले होते असे देखील सांगण्यात आले. तर मागील पाच वर्षांमध्ये आमदार निधी मिळावा म्हणून किती पत्र व्यवहार केला याचे उत्तर देताना एकदाही आमदार निधी मिळावा म्हणून मागणी केली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता तेच सूर्यकांत वाघमारे यांनी विधानसभेत त्यांच्या सोबत राहून महायुतीचे काम केले व आमदार सुनील शेळके यांचा प्रचार केला होता. आता मावळचे आमदार सुनील शेळके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहिलेल्या कामासाठी २ कोटी ७८ लाख निधी साठी विनंती केली आणि आमदारांनी ती लगेच एक वर्षात सदर निधी देण्याचे मान्य केले आहे. आता त्यासाठी निधी मंजूर होइल का? प्रत्यक्ष निधी कधी मिळेल? हे कळेलच. लोणावळा शहरांमधील प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचा प्रश्न हा तांत्रिक बाबी मध्ये अडकलेला आहे. जोपर्यंत या तांत्रिक बाबी सुटत नाहीत तोपर्यंत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार नसल्याची स्पष्टॊक्ती प्रशासनाच्या वतीने करण्यातआली आहे. नांगरगाव बाजूकडील एक भूसंपादन वतीन खांब उभे करण्याचे काम शिल्लक आहे तर भांगरवाडी बाजूकडील एका जागेचे भूसंपादन व त्या ठिकाणी एक खांब उभा करण्याचे काम शिल्लक आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या जागा भूसंपादनाच्या कामांमध्ये कोणतीही प्रगती झाली नाही जोपर्यंत सदर जागांचे भूसंपादन होत नाही, तोपर्यंत या कामाला सुरुवात होणार नसल्याचे या आढावा बैठकीत ही प्रशासनाची बाजू समोर आली आहे. यावेळी लोणावळा शहरासाठी आमदारांचे योगदान काय? ३०० कोटींचा स्काय वॉल्क प्रकल्प हा ग्रामीण भागासाठी होऊ शकतो, औद्योगिक वसाहती ह्या वडगांव तळेगाव येथे झाल्या आहेत. परंतु लोणावळ्यात फक्त पर्यटनावर रोजगार अवलंबून असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. असाही सुरु माजी लोकप्रतिनिधी यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी लोणावळा नगर परिषदेच्या विकास अजेंड्यावर मागील अनेक वर्षांपासून असलेल्या रोपवेचा प्रकल्प जागा विकत घेतल्यानंतर देखील मागील तीस वर्षांपासून धूळखात पडला आहे. राजमाची गार्डन येथील जागा ही वनविभागाची असून ती वनविभागाने ताब्यात घेतली असल्याने रोप वे च्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची गती प्राप्त झालेली नाही. याकरिता कुणेगाव हद्दीमध्ये विकत घेतलेल्या जागेमध्ये बगी जम्पिंग सारखा प्रकल्प सुरू करावा असा प्रस्ताव या आढावा बैठकीच्या निमित्त प्रमोद गायकवाड यांनी मांडला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचा शेजारी मुबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत उद्यान विकसित करण्याचे काम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी केवळ रिटेनिंग वॉल व एक संडास बाथरूम बांधण्या व्यतिरिक्त कोणतेही काम झालेले नसल्याने माजी लोकप्रतिनिधी यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासकीय कालखंडामध्ये रखडलेल्या कामांबाबत प्रशासनाची कान उघडणी देखील यावेळी केली आहे.वळवण तलाव येथील कामांचा अतिशय सुंदर असा विकास अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. सात ते आठ कोटींचा हा प्रकल्प आहे. मात्र त्याच वेळी खंडाळा तलाव सुशोभीकरण जसं काल्पनिक दाखवलं होतं त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात झाले नाही. खंडाळा तलाव परिसरात असलेली झोपडपट्टी मुळे या ठिकाणी पर्यटन वाढीवर मर्यादा येत असल्याचे मत प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.त्या ठिकाणी अजून काही खर्च करुन तेथील पर्यटन वाढीवर भर द्यावा असेही गायकवाड यांनी या वेळी सांगितले.वळवण तलाव सुशोभीकरण कामासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध झाल्यास सदरचे काम दीड ते दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल अन्यथा या कामाला मोठा कालावधी लागणार असल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावेळी वेळेत काम होणार असेल तरच सुरू करा अशी खोचक सवाल बाळासाहेब जाधव यांनी केला. लोणावळा शहरांमधील भाजी मंडईचा देखील विकास आराखडा आमदार सुनील शेळके यांनी तयार करुन मागील पाच वर्षात लोणावळा शहराला किती निधी दिला ? असा सवाल यावेळी माजी लोकप्रतिनिधी यांनी केला. भाजपचे सरकार आहे निधी कमी पडू देणार नाही असे मत सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र मध्ये भाजपचे म्हणजे आमचे सरकार असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मागील पंचवार्षिक काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचा निधी लोणावळा शहरासाठी दिला होता. इथून पुढे देखील निधीची कमतरता भासणार नाही. आमचे सरकार आहे निधी कमी पडून देणार नाही, तुम्हाला ज्या ठिकाणी अडचण येते त्या कामांच्या फायली आमच्याकडे द्या आम्ही त्या मंजूर करून आणू असे सुरेखाताई जाधव यांनी यावेळी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी निधी मंजूर झाला मात्र पैसे अद्याप आलेच नाही अशी परिस्थिती आहे. लोणावळा शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांपेक्षा जादाचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र तो निधी अद्याप पर्यंत आलाच नसल्याचे या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आमदार सुनील शेळके यांनी एक महिन्याच्या कालावधीमध्ये आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळवत तीन कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र हा निधी अद्याप पर्यंत लोणावळा नगरपरिषदेकडे वर्ग झाला नसल्याचे प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.थोडक्यात काय तर एका आढावा बैठकीत आमदारांच्या कोटी कोटिच्या वलग्ना प्रत्यक्षात एक रुपयाचा निधी अदयाप मिळाला नसल्याचा पालिका प्रशासनाकडून खुलासा, १० मार्चला पालिकेला टाळा ठोकण्याचा आमदारांचा इशारा तर दुसऱ्या माजी लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीत मात्र प्रशासनाला सहकार्याची आणि तांत्रिक अडचणी शासनामार्फत सोडवण्याची भूमिका यात जनतेनेच ठरवावे या कलगी तुऱ्यात कोणाची भूमिका योग्य ती.




