जागतिक स्तरावर सीएंची प्रतिष्ठा अधिकच वाढली- सीए तलाठी

मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रतिनिधी) पावणेचार लाख सीए आणि सुमारे साडेसात लाख सीएचे विद्यार्थी अशी सुमारे अकरा लाख सदस्य संख्या असलेली दि इंस्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडिया(आयसीएआय) लेखापाल क्षेत्रात कार्यरत असलेली जगात सर्वात मोठी संस्था आहे. मात्र आयसीएआयने २०२२ मध्ये आयोजित केलेल्या वर्ल्ड कॉंग्रेसमुळे सीएंची जागतिक स्तरावर मान अधिकच उंचावली. आणि त्यामुळे जागतिक स्तरावर सीएची प्रतिष्ठा अधिकच वाढली. असे गौरवोद्गार आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांनी काढले. आयसीएआयच्या पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आयसीएआयच्या पिअर रिव्हिऊ बोर्डचे अध्यक्ष डॉ अनुज गोयल, एथिकल स्टँडर्ड्स बोर्डचे अध्यक्ष सीए चंद्रशेखर चितळे,पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए सचिन बंसल, उपाध्यक्ष सीए पंकज पाटणी, सचिव सीए सारिका चोरडिया,खजिनदार शैलेश बोरे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, कार्यकारी सदस्य सीए सचिन ढेरंगे,विभागीय माजी सदस्य डॉ अशोककुमार पगारीया व सीए सर्वेश जोशी,पुणे शाखाध्यक्ष सीए राजेश आगरवाल, उपाध्यक्ष सीए अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.सीए तलाठी पुढे म्हणाले कि, मुंबईत गेल्या वर्षी आयोजित वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये जगातून ८ हजार सीए सहभागी झाले होते. हे वर्ल्ड कॉंग्रेस हे चार वर्षांतून एकदा जागतिक पातळीवर आयोजन केले जाते. गेल्या वर्षी भारताकडे यजमानपद होते. वर्ल्ड कॉंग्रेसच्या धर्तीवर दरवर्षी आपल्या देशात ग्लोपॅक नावाने परिषदेचे आयोजन केले जाणार अशा घोषणा त्यांनी केली.येत्या १ जुलैपासून ५ पेक्षा जास्त भागीदार असलेल्या सीएंनी केलेले लेखापरीक्षण हे त्रयस्थ सीएंकडून गुणवत्ता पडताळणी (पिअर रीव्हीव) करून घेणे सक्तीचे होणार आहे असे ही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सीए सचिन बंसल तर यांनी प्रास्ताविक सीए सारिका चोरडिया यांनी केले. सूत्रसंचालन सीए रित मेघराजानी हिने तर आभार सीए पंकज पाटणी यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page