संतदास उर्फ श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर संत ज्ञानेश्वर साहित्य रत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित

मावळ मराठा न्युज – रविवार दि. २३/फेब्रुवारी /२०२५ रोजी काव्य निनाद यां साहित्य संस्थे द्वारा आयोजित साहित्य संमेलनात आळंदी दे येथे संमेलनाध्यक्ष श्री प्रकाश भि.पाठक साहेब यांचे हस्ते श्री संतदास उपाख्य पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्य सेवेची दखल घेऊन यांना संत ज्ञानेश्वर साहित्य रत्न पुरस्कार २०२५ देण्यात आला. हिंगणकर महाराज यांचे अभंग निर्झर भाग १, अभंग निर्झर भाग २, वासुदेव पासष्टी, व ऑनलाईन १२० पुस्तके नी अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे द्वारा इतर साहित्यकांना साहित्य कमी प्रोत्साहन देन्याचे कार्य गेली कोरोनाकाळा पासून अविरत साहित्य सेवेत स्वतःला झोकून दिले आहे आता पर्यंत जवळ जवळ बरेच विपुल प्रमाणात अभंग व इतरही काव्य लेखन केलेले आहे.तसेच सामाजिक कार्य स्वच्छता अभियान कीर्तन प्रवचणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत पर्यवरण सेवाही झाडें लावून करीत आहेत आज पर्यंत त्यांना १६ पुरस्कार मिळाले आहेत व इतर सन्मानही आहेत बरेच साहित्य संमेलने त्यांच्या अध्यक्ष ते खाली किंवा प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली आहेत हिंगणकर महाराज हिंदी संस्कृत व मराठी मध्ये काव्य लेखन करतात. पुरस्कार प्रदान करतांना यां प्रसंगी मंचावर संमेलन उदघाटक सौ.अनुराधा बेके,, काव्य निनाद संस्थेचे अध्यक्ष श्री विकास पालवे संमेनाचे उदघाटक सौ. अनुराधा बेके,प्रमुख अतिथी सौ नीता भामरे, सौ विनिता कदम,सूत्र संचालक ऍड उमाकांत आदमाने,माधव गुरव,जेष्ठ कवी श्री वासुदेव सोनटक्के,सौ रेखाताई मालपुरे,श्री वानखेडे आदी करून विठ्ठल शिंदे अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे डॉ सुनील वाघमारे आदी करून अनेक मान्यवर कवी,कवयित्री कार्यक्रमात हजर होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page