लोणावळा नगरपरिषद लोणावळेकरांना मुद्दाम डिवचते का ? सगळीकडे वाढलेय घाणीचे साम्राज्य,तरी बिव्हीजीच बरोबर,हे प्रशासनाने सिद्ध कराव




मावळ मराठा न्युज :- लोणावळा,सध्या लोणावळ्यात चाललंय तरी काय? काहीच कळायला मार्ग मार्ग नाही एवढे दूषित वातावरण अशांत लोणावळा याआगोदर कधीच झाले नव्हते २००२ च्या दरम्यान भ्रष्ट्राचार आणि नगरपालिकेच्या अनगोंदी कारभारामुळे ४ जण उपोषणालाबसली होती. त्यावेळेस नगरविकास मंत्री असलेले सुनील तटकरे लगेच लोणावळा नगरपरिषद बरखास्त केली होती. आता तर प्रशासकीय राजवट आहे. शहरात एवढ्या मोठ्या आणि सलग जागरूक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाकडून आंदोलने सुरु असताना गेंड्याच्या कातडीचे प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. भारतरत्नं डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, संत गाडगे महाराज या महापुरुषांच्या समुह शिल्पा च्या कमानी वरची लाईट १५ दिवस होऊन गेले तरी अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बीव्हीजी ही जर इंटर नॅशनल कंपनी आहे,आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तर त्या कंपनीला ठेका देऊन एक महिना झाला तरी त्यांची यंत्र सामुग्री,बिव्हीजी कंपनीचे कर्मचारी कुठेही कामं करताना दिसत नाहीत. महापुरुषांच्या पुतळ्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष का केले जात आहे. गावात प्रशासनाविरोधात एवढा असंतोष असताना लोणावळा नगरपरिषद प्रशासन बिव्हीजी कंपनीवर अवलंबून न राहता आपली यंत्रणा राबवून महापुरुषांच्या समुह शिल्पा च्या कमानी वरची लाईट,डुकरांचा सुळसुळाट,शहरातील अस्वछता या समस्या जातीने लक्ष देऊन का सोडवत नाही हा माझ्या सारख्या लोणावळाकर नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्यावतीने या बिव्हीजी कंपनीला गुण देता त्या कंपनीचे समर्थन करता तर आम्ही तुम्हाला घाणीचे साम्राज्य ठिकाणचे फोटो पाठवून देखिल तुम्ही त्यावर कोणतीही कारवाई आणि कार्यवाही करत नाहीत त्यामुळे नक्कीच कुठे तरी पाणी मुरयतय या शंकेला वाव मिळतो. महापुरुषांचा अवमान लोणावळा नगर पालिकेकडून सातत्याने होत आहे हे कुठे तरी जेव्हा थांबत नाही तेव्हा हे लोणावळेकर नागरिकांना डिवचायचं कामं पालिका प्रशासन करतेय का असा संशय येतो. ६ कोटीचे १२ कोटी झाले तर त्याप्रमाणात कामसूद्धा तेव्हड्याच उच्च दर्जाचे व्हायला पाहिजे ही माफक अपेक्षा लोणावळेकर व्यक्त करत आहे. मुख्यत्वे करुन स्वच्छता हा मोठा विषय आहे तीच होत नसेल बिव्हीजी कंपनी कडून तरी बिव्हीजी कंपनीचे गुण गाणे म्हणजे ढ पोराला स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसवण्यासारखे आहे. लोणावळा अशांत राहणं प्रशासनाने पण आपली मनमानी थांबवली पाहिजे आणि लोणावळ्यातील जनतेला काय वाटतं याचा प्रामुख्याने विचार लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी विचार केला पाहिजे.




