एकविरा देवस्थानमध्यें कोणताही भ्रष्टाचार झाला नाही,होणार नाही आणि होऊही देणार नाही -दिपक हुलावळे,अध्यक्ष एकविरा देवस्थान

मावळ मराठा न्युज -(गणेश वायकर) कार्ला,श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर वमाझ्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा खुलासा श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. माझी पत्नी व पीएमआरडीए ची संचलिका दिपाली हुलावळे हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे नैराश्यातून श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या एका गुरवाला हाताशी धरून माझ्यावर व श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर खोटेनाटे आरोप केले गेले आहेत. मात्र मागील एक वर्षांमध्ये अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर आई एकविरा देवीच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी झालेली विकास कामे व सुरू असलेली कामे ही सर्वश्रुत आहेत त्यामुळे अशा बदनामीकारक व खोट्या आरोपांना आई एकवीरा देवीचे भाविक व जनता भीक घालणार नाही. आरोपांमुळे या सर्व प्रकरणामागील खरा चेहरा कोण आहे हे देखील जनतेच्या लक्षात आले आहे.मागील सहा वर्ष या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर गुरव प्रतिनिधी पुजारी व स्थानिक भाविक अशा सात जणांची देवस्थान वरती निवड करण्यात आली. प्रशासकीय समितीकडून सर्व कार्यभार या सात जणांच्या समितीने हस्तांतरित करून घेतला. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर दोन भाविकांमधून दिपक हुलावळे व खासदार बाळ्या मामा यांची देवस्थान ट्रस्टवर निवड करण्यात आली. पुजारी गणेश देशमुख यांनी केलेला आरोपच मुळात खोटा व चुकीचा आहे अश्यास्पष्ट शब्दात दिपक हुलावळे यांनी सदर आरोप फेटाळले. दिपक हुलावळे यांनी याबाबत आम्ही या पदावर आल्यानंतर श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या परिसरामध्ये पायरी,रस्ता व वाहनतळ ही कामे सुरू केली . गडावर वाहने लावण्यासाठी जागा नसल्यामुळे श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट ची गाडी कार्ला फाटा येथील माझ्या कार्यालयासमोर उभी असते.असेही हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त त्या गाडीचा वापर करत असतात. माझ्या स्वतःच्या अनेक गाड्या आहेत त्यामुळे देवस्थानची गाडी मी वापरतो हा देखील आरोप खोटा व चुकीचा आहे.असेही त्यांनी सांगितले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे याआधी QR कोड नव्हते. आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी QR कोड लागू केले. त्या ठिकाणी स्कॅन केल्यानंतर रक्कम थेट देवस्थानच्या खात्यामध्ये जमा होते. जमा होणाऱ्या रोख रकमेचा भरणा त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये केला जातो. देवीच्या अभिषेकासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाची रीतसर पावती बनवली जाते व ते पैसे खात्यामध्ये जमा होतात. देवस्थानचा कारभार हा अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे असेही हुलावळे यांनी सांगितले.देवस्थानचा बराच भाग हा पुरातत्त्व विभाग व वनविभाग यांच्या अखत्यारीत येतो त्यामुळे विकास कामे करताना अनेक परवानग्या घ्यायला अडचणी येतात त्या लवकरच सोडवून भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे हुलावळे यांनी सांगितले. पायथा ते पार्किंग पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करून लवकरच त्याचे डांबरीकरण देखील केले जाणार आहे.त्यामुळे असे बदनामीकारक आरोप करणाऱ्यांनी आपले खोटे आणि बिनबुडाचे आरोप करण्याआधी देवस्थानच्या कारभारा संदर्भातील सर्व कागदपत्रे ट्रस्टकडे उपलब्ध आहेत. त्यांनी प्रत्यक्ष येऊन सर्व खात्री करावी त्यानंतर आरोप करावे असे देवस्थान चें अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांना मी कायदेशीररित्या नोटीस बजावत मानहानीचा खटला देखील दाखल करणार असल्याचे दिपक हुलावळे यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची अफरातफर अथवा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला नाही, होणार नाही व होऊही देणार नाही. आई एकविरा देवीने मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आहे, या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवील असा विश्वास दीपक हुलावळे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.देवस्थान ट्रस्ट मधील गुरव प्रतिनिधी मारुती देशमुख, नवनाथ देशमुख, महेंद्र देशमुख तसेच देवीची दैनंदिन पूजा अर्चा करणारे गुरव प्रतिनिधी यांनी देखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट व दीपक हुलावळे यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांचे फेटाळून लावले. याबाबत बोलतांना जाणीवपूर्वक आमच्यातील काही लोकांना हाताशी धरत राजकीय पोळी भाजण्याची काम काही मंडळी करत आहेत. उलट दिपक हुलावळे यांच्या छोट्याशा आणि अल्प काळात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा आणि पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न श्री एकविरा देवस्थान कडून होत असल्याचे विश्वास्थानी पत्रकार परिषदेत सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page