लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील पान टपरीवर लोणावळा विभागचे सहायक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची धडक कारवाई



मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान टपरीवर लोणावळा विभागचे सहायक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची धडक कारवाई केली आहे.लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीमध्ये आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमी द्वारा मार्फत बातमी मिळाली की, पानटपरीवर गांजा, एम. डी पावडर यांची पानामध्ये मिसळुन शाळा व कॉलेज मधील मुलांना सर्रासपणे विक्री केली जाते असे माहिती मिळल्याने सदर माहितीच्या अनुषंगानेलोणावळा शहरातील १) प्रेम बाळासाहेब जाधव वय १९ रा. शिलाटणे ता. मावळ,पान स्टॉल नाव चैतन्य पान शॉप-रायवुड मंदीर रोड २) नरेश नगाराम सुर्यवंशी, वय ४५, रा.लोणावळा ता. मावळ,पान स्टॉल नाव नरेश पान शॉप ३) विनायक शंकर दहिभाते,वय २८, रा. कामशेत ता. मावळ,पान स्टॉल नाव साईरतन पान शॉप ४) निखील हरिदास आझाणकर,वय २४,रा.पांगोली ता. मावळ,पान स्टॉल नाव महालक्ष्मी पान शॉप ५) राहुल सुनिल शेलार, वय २१ रा.आँढे, ता. मावळ, पान स्टॉल नाव पैलवान पान शॉप याठिकाणी जावून सदर टपरीची तपासणी केली असता सदर टपरी मध्ये मिळून आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आलेले असुन सदर पावडर व इतर साहित्य तपसणी करीता मा.अन्न प्रशासन पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात येणार असुन अन्न प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर सदर पानटपरी मालक व चालक यांच्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच लोणावळा शहर व ग्रामीण पान टपरी मालक व चालक यांनी पान टपरीवर १८ वर्षाखालील मुलांना तंबाखु जन्य पदार्थाची विक्री करणार नाही, पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरी मध्ये १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करून लावण्यात यावा पान टपरी मध्ये सी.सी.टि.व्ही कॅमेरा लावणे इत्यादी सक्त सुचना सत्यसाई कार्तिक यांनी दिल्या आहेत. तसेच पोलीस स्टेशन कडुन टपरी चालक व मालक यांना पानटपरी बाबत योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहेत व मुख्याधिकारी लोणावळा नगर परिषदलोणावळा यांना शाळा व महाविद्यालयाच्या १०० मिटरच्या आवारातील तंबाखु व इतर तत्सम पदार्थ विकणा-या पान टपरी वर तात्काळ कारवाई करणे बाबतचे लेखी पत्र देण्यात आलेले आहे.सदर पानटपरी धडक कारवाईत सत्यसाई कार्तिक, सहा.पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा यांच्या उपस्थिती व लोणावळा शहर पोलीस स्टेशन सुहास जगताप पोलीस निरीक्षक,राहुल लाड सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार, पवन कराड असे कारवाई करीता हजर होते.




