मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. दत्तात्रय गवळी यांच्या आठवणींना उजाळा

मावळ मराठा न्यूज – लोणावळा : मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनला २०२३ या साली २५ वर्ष (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण झाली आहे. अनेक खडतर मार्गातून प्रवास करत या संस्थेने रोपट्याचे रूपांतर वृक्षात केले आहे. ते केवळ संस्थापकीय कार्याध्यक्ष कै. दत्तात्रय कों. गवळी व संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांच्या प्रचंड मेहनतीने हे फळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्याबरोबर असणारे सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज या संस्थेतून १७०० विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहे व शिकत आहे. संस्थेच्या मावळात व लोणावळ्यात विविध ठिकाणी शाखा आहेत व तायक्वोंदोचे क्लासेस घेतले जातात. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा भांगरवाडी, लोणावळा. येथे रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. दत्तात्रय कों. गवळी यांच्या नावाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच वर्ष भरात ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय,राज्यस्तरीय, तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य, कास्यपदक मिळवलेल्या खेळाडूंचाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात प्रथम कै. दत्तात्रय कों. गवळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पुष्प वाहण्यात आले . तदनंतर दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्षा लोणावळा श्रीमती सुरेखाताई जाधव माजी उपनगराध्यक्ष लोणावळा श्रीधरजी पुजारी, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे निखिल कविश्वर संस्थेचे कार्याध्यक्ष मा. गणेश दत्तात्रय गवळी, संस्थापक अध्यक्ष मा. मास्टर विक्रम बोभाटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी संस्थेचे सरचिटणीस हर्षल होगले, जाकीर खलीफा आदी मान्यवर उपस्थित होते. निखिल कविश्वर यांनी संस्थेबद्दल माहिती व विविध अनुभव सांगितले. सुरेखाताई जाधव यांनी कै. दत्तूभाऊ व विक्रम बोभाटे यांनी कशाप्रकारे संस्था उभारणीसाठी खडतर प्रवास केला यांबद्दल मार्गदर्शन केले. श्रीधर पुजारी यांनी संस्थेबद्दल अनुभव व्यक्त करीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याबद्दल तप्तर आहे असे सांगितले. नारायण पाळेकर मा. दिलीप लोंढे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर . सुधीर शिर्के , जितूभाई कल्याणजी, रवी पोटफोडे, यशवंत पायगुडे संस्थापक चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थाचे मारुती साठे मा. नगरसेवक दत्तात्रय येवले ,विनोद भोगले, सनी पाळेकर,योगेश पैलकर, रवी बोईने मनोज द. गवळी . सूर्यकांत औरंगे , प्रशांत गवळी,श्रावणी कामत संजय चव्हाण तसेच सरचिटणीस हर्षल होगले, सदस्य अमोल गायकवाड, पार्थ गवळी, संस्कृती गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर खरीफा यांनी तर आभार जितेंद्र कल्याणजी यांनी मांडले कार्यक्रमा अंतर्गत खेळाडूंचे विविध गुणदर्शनाचा लाभ मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page