मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर गुन्हे दाखल,आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचीधडक कारवाई

मावळ मराठा न्युज – मावळ,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक १०.०१.२०२५ रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना तसेच वाद्य,ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३३(डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page