खंडाळा येथे नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद









मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब लोणावळा व जनसेवक मावळ तालुकाचे अध्यक्ष शौकत् भाई शेख S V A C आय केयर् सेन्टर चे डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित आले. चष्मे व चेकअप फ्री करण्यात आले एकूण १७५ लोकांनी याचा लाभ घेतला. १९ लोकांना मोतीबिंदू निघाले व ८५ चष्मे नागरिकांना देण्यात आले.या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या प्रेसीडेन्ट साधना टाटिया यांच्या वतीने सदर चष्मे वाटण्यात आले. डॉक्टर सुरेश शर्मा व डॉ. श्रुती यांच्या टीम ने चेकअप केले. या कार्यक्रमात बक्षी सर श्रुती शहा,प्रथमेश रजपुत, राजेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.



