परमपूज्य श्री सिद्धी सुधाजी महाराज साब यांची मौन महामांगलिक श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ लोनावळा येथे संपन्न






मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा येथे श्री सिद्धी सुधाजी महाराज साब आधी ठाणा तीन चा चातुर्मास अतिशय उत्साह पूर्वक सुरू असून यादरम्यान श्री सिद्धी सुधाजी महाराज साब यांनी पंधरा दिवसीय मौन धारणा केली व त्याचा समारोप 26 तारखेला महामांगलिक देऊन झाला. यासाठी अनेक गावावरून भक्त जन आलेले होते. श्री संघाचे अध्यक्ष श्री गिरीश जी धनराजजी पारख यांनी सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्व भक्त जणांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था श्रीमती कांताबाई चंपालालजी नहार परिवारातर्फे करण्यात आली.



