भंडारा डोंगर जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्या ठिकाणी होळी ऊत्सव साजरा



मावळ मराठा न्युज-मावळ,आज भंडारा डोंगर जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्या ठिकाणी सुरु असलेल्या, जगाच्या पाठीवर ना भूतो ना भविष्य असा भव्य दिव्य अखंड हरीनाम सप्ताह नियोजन समितीच्या वतीने व हिन्दु धर्माच्या परंपरे प्रमाणे होळी साजरी करण्यात आली, सदर होळीच्या पूजेचा मान ह. भ. प. श्रीगुरू ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) आणि सर्वांचे मार्गदर्शक,मुळशी-मावळ भूषण,जनसेवक, श्री. नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांना मिळाला. मावळ मुळशीकरांचे अहोभाग्य म्हंटले तरी वावग ठरणार नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्र प्रांतांतून आलेल्या मोठ्या मोठ्या सांप्रदायातील महाराज , साधुसंत ,महाराष्ट्रातील मोठे मोठे राजकीय नेते त्या सर्वांनमधुन बाबूजींच्या वाट्याला ही सेवा येते म्हणजे नक्कीच ही मावळ मुळशी साठी अभिमानाची बाब आहे.




