नाट्यरसिकांसाठी पर्वणी! ‘गंध’च्या रूपाने संवेदनशील कथा रंगमंचावर

मावळ मराठा न्युज नेटवर्क -मुंबई, मानवी भावभावनांचा सुगंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ‘गंध’ हे हिंदी नाटक २२ मार्च २०२५ रोजी रंगमंचावर सादर होणार आहे. नट रंगभूमी थिएटर सोसायटीच्या या विशेष सादरीकरणाचे दिग्दर्शन मनीष शिर्के यांनी केले असून, कथा समता सागर, हर्षल आल्पे, विभा राणी आणि जयंत गाडेकर यांनी लिहिली आहे.या नाटकात रागिनी पांडे, वृंदा सिंग आणि राम गंगवार यांचा प्रभावी अभिनय पाहायला मिळणार आहे. मानवी नातेसंबंध, आठवणी आणि भावनिक गुंतागुंत यांचा वेध घेणारे हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास रंगकर्मी व्यक्त करत आहेत.या वेगळ्या धाटणीच्या नाट्यप्रयोगाला रंगभूमीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता क्रिएटिव्ह अड्डा, अंधेरी (प.) येथे हा नाट्यप्रयोग रंगणार असून, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page