तज्ञ डॉक्टरांनी दिली ज्येष्ठांना आरोग्याची गुरुकिल्ली








मावळ मराठा न्युज -प्राधिकरण निगडी- प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ ,शब्दरंग कला साहित्य कट्टा ,भजन महासंघ ,स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ,महिला विभाग आणि पॅन ऑर्थो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व निरामय आरोग्यदायी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिकाबरोबर तज्ञ डॉक्टरचा खास संवाद, हा कार्यक्रम दि २३ मे रोजी,निगडी येथील ग दि माडगुळकर नाट्यगृहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप महानिरीक्षक श्री अतुल पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी “ रोबोटिक स्पाइन उपचार प्रणालीचे” उद्घाटन केले.यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती कैलास कुटे,नगरसेविका सौ. शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पिंपरी चिंचवड व नगरसेवक योगेश बहल तसेच पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष वृषाली मरल, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी, शब्दरंग साहित्य कट्टयचे अध्यक्ष सुभाष भंडारे, ज्योती कानिटकर, माधुरी ओक, रश्मी दाते व पॅनऑर्थोचे संचालक डॉ उमेश जाधव, एस प्रशांत आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते “कुटुंब आरोग्य रक्षक कार्ड”ही योजना कार्यान्वित करण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय सेवेत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.यावेळी बोलताना श्री. अतुल पाटील म्हणाले की हे डिजिटल युग आहे. त्यामुळे रोबोटिक सारख्या तंत्रप्रणाली आता उपचारामध्ये डॉक्टरांना साथ देतात. त्यामुळे उपचारात अधिक अचूकता व यश निर्माण करता येऊ शकते. मणक्यावर शस्त्रक्रियेविना उपचार होतात ही आनंदाची बाब आहे. या महागाईच्या काळात संपूर्ण कुटुंबाला आरोग्यासाठी सवलतीत सेवा देणारी योजना हे आरोग्य व्यवस्थेसाठी आशादायक पाऊल आहे. ज्येष्ठांनी विचारलेल्या गुडघेदुखी, मणक्याचे व हृदयांचे आजार यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे पॅन ऑर्थो हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी दिली. जवळपास ९८ % रुग्णांना मणक्याच्या आजारात शस्त्रक्रियांची गरजच नसते. वेळीच तपासणी व योग्य उपचार केले तर शस्त्रक्रिया टाळता येतात असे डॉ. गणेश मुंढे म्हणाले.या संवादात डॉ. उमेश जाधव, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. गीतांजली जाधव, नेत्र विकार तज्ञ डॉ. एस प्रशांत , हैंड सर्जन डॉ. राहुल बोंद्रे, रोबोटिक सांधे रोपण तज्ञ डॉ. गणेश मुंढे, स्पाइन सर्जन डॉ.ज्योत्स्ना पाटील, डॉ. प्रमोद पाटील , डॉ. वेदश्री प्रशांत, दंतरोग तज्ञ, डॉ. सौ आचार्य, हेयर ट्रान्सप्लांट डॉ. मंदार आचार्य, लहान मुलांचे अस्थिरोग तज्ञ डॉ.सौ. अपर्णा आचार्य, डॉ. विशाल मोहिते, अतिदक्षता तज्ञ डॉ. सिध्देश्वर, अति दक्षता तज्ञ सहभागी झाले होते.फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वाती शितुरकर प्रथम, सुनीता भंगाले द्वितीय, सुजाता चिटणीस तृतीय,ज्ञानेश्वर शिंदे चतुर्थ, सुनीता यन्नुवार पाचवे यांनी बक्षीस पटकावले.या स्पर्धेचे परीक्षण , अमृता ओंबळे आणि प्राजक्ता निफाडकर यांनी केले.डॉ. श्रीकृष्ण जोशी व ज्योती कानिटकर यांनी सूत्र संचलन केले. डॉ. राहुल बोंद्रे यांनी आभार प्रदर्शन केले.



