लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमानी साजरा



मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२५ चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले होते.रविवार दिनांक १६ रोजी सुंदर सजावट करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुड पुतळ्याचे पूजन व सजावटीचे उदघाटन मावळ लोकसभेचे महा संसद रत्न खासदर श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावर्षीची शिवजयंती मिरवणूक डी जे विरहित करत तो खर्च लोणावळा शहरातील शिवदुर्ग ऍनिमल रेस्कु टीम व आधार फौंडेशन सामाजिक संस्था यांना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते दोन्ही सामाजिक संस्था चा सन्मान व आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.तसेच स्थानिक गायक कलाकारांचा “अभिमान महाराष्ट्राचा स्वर शिव गर्जनेचा ” हा कार्यक्रम संपन्न झालासर्व स्थानिक गायक कलाकारांचा सन्मान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आलाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद वासकर, संयोजन शत्रूघन खंडेलवाल, अनिल बांदल यांनी केलेसोमवार १७ मार्च रोजी सकाळी सर्व शिवजोतींचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे हस्ते करण्यात आलेश्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते..सायंकाळी ६ वाजता मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकीचा शुभारंभ पोलीस निरीक्षक सुहासजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आलामिरवणूकीतील मुख्य आकर्षण पारंपरिक वाद्य शारदा ढोल ताशा पथक, कोल्हापूर येथील शिवकालीन मर्दानी खेळ व हलगी वादन करण्यात आलेमिरवणुकी नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झालाया कार्यक्रमासाठी आर पी आय ( आठवले) महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांतजी वाघमारे,सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव मंजुश्री ताई वाघ, भाजपचे मा नगरसेवक देविदास कडू, युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी, युवासेना तालुका अध्यक्ष विशाल हुलावळे, उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण पाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे अध्यक्ष नासिर शेख, भाजप लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, आर पी आय शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, एस आर पी अध्यक्ष बाबा ओव्हाळ, मा नगरसेवक बाळासाहेब जाधव, मा नगरसेविका जयश्री आहेर, मा नगरसेविका मंदाताई सोनवणे, मा नगरसेविका अपर्णाताई बुटाला,मा नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पांडुरंग तिखे, रेल्वे रिटायरड फेडरेशन चे अध्यक्ष दिलीप पवार, मा नगराध्यक्ष बलराज रिले, बापू तारे, प्रदीप वाडेकर, सुनिल म्हस्के, संजय गोळपकर, अनिल गायकवाड, किरण स्वामी,राजेश मेहता, अशोक साळवे,संतोषी तोंडे, जाकीर खलिफा, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, मा नगरसेवक संजय गायकवाड, लोणावळा शहर पत्रकार संघांचे विशाल विकारी, संजय पाटील, विशाल पाडाळे, राजेंद्र दिवेकर, मनसेचे अमित भोसले, निखिल भोसले, विजय आखाडे, सनी घोणे, समीर खोले,नवनाथ हारपुडे, हर्षल होगले, दिनेश कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते लोणावळा शहर शिवजयंती उत्सवाचे आयोजन व नियोजन शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्व्यक नंदू कडू,उपशहर प्रमुख विनायक शिंदे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, महिला आघाडी संघटिका मनीषाताई भांगरे, दिपालीताई शिरंबेकर, सल्लागार राजूभाऊ चव्हाण, सल्लागार पराग राणे, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, उपविभागप्रमुख नरेश घोलप, उपविभाप्रमुख केतन फटाक, शाखाप्रमुख परेश वावळे, युवासेनेचे यशोधन शिंगरे, आतिष भांगरे, अंश घोणे, सर्व शिवसेना- युवासेना-महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी केले..




