पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोणावळ्यात भव्य उद्घाटन!

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा आणि परिसरातील पशुपालकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी! लायन्स क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्यातून श्रद्धा गौसेवा पांजरपोळ, श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशन अध्यक्ष पल्लवी गांधी आणि अश्विन गांधी यांचा पुढाकाराने कुसगाव, साठे वस्ती, लोणावळा येथे एका भव्य आणि आधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन गुरुवार, दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक पशुपालकांना त्यांच्या मोठ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे.त्यांना होणारे आजार अपघाती अपंगत्व ही गरज ओळखून आणि प्राण्यांप्रति असलेली बांधिलकी जपत, लायन्स क्लब ऑफ मुलुंडने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांच्या उदार हस्ते या पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणी साठी मोलाचे सहकार्य केले, लोणावळा आणि आसपासच्या परिसरातील मोठ्या जनावरांना उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत.या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकारलेल्या या रुग्णालयामुळे निश्चितच अनेक पशुधनाचे प्राण वाचणार आहेत आणि पशुपालकांना मोठा आधार मिळणार आहे.या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन सी.ए. मनीष लाडगे (जिल्हा गव्हर्नर ३२३१ ए२) तसेच माननीय अतिथी म्हणून लायन विजय सरदार (जिल्हा गव्हर्नर ३२३४ डी४) हे देखील उपस्थित होते. या भव्य पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लायन्स क्लब ऑफ मुलुंडचे सदस्य तसेच, अध्यक्ष एमजेएफ लायन भरत छेडा आणि इतर अनेक दानशूर सदस्यांनी यासाठी आर्थिक मदत पुरवली आहे. तसेच, लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे सदस्य ॲड .प्रफुल्ल लुंकड, डॉ. दिलीप सुराणा, श्री. मंगेश कदम, श्री. अभय जैन, सौ. दिपाली गाला, डॉ. पोपट ओसवाल, सौ. चार्मी पारेख, सौ. कांता ओसवाल, सीमा पारख श्री. मनोज लुंकड, श्री. प्रकाश जैन राजुभाई परेश मुथा नितीन पारेख आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.या प्रकल्पासाठी जमीन देणगीदार म्हणून श्री. रमेशचंद्र रायचंद पारेख देवल पारेख, चार्मी पारेख आणि अवि पारेख यांनी उदार मनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला नमन करतो हे रुग्णालय एक प्रेरणास्रोत ठरेल.या रुग्णालयाचे व्यवस्थापन लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष आणि जैन जीवदया फाउंडेशनचे संचालक श्री. विरल गाला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यांची प्राण्यांप्रति असलेली तळमळ आणि व्यवस्थापन कौशल्ये या रुग्णालयाला यशस्वीपणे चालवण्यासाठी निश्चितच मदत करतील. लायन पल्लवी अग्रवाल.लायन जितेंद्र छाब्रा यांच्यासह सर्व सदस्यांनी या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या समर्पित भावनेमुळेच हे महत्त्वपूर्ण कार्य साकार होत आहे हे पशुवैद्यकीय रुग्णालय केवळ एक इमारत नसून ते एक असे केंद्र आहे जिथे मोठ्या जनावरांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल. आजच्या परिस्थितीत, जेव्हा पशुधन हा अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा आणि जीवनाचा आधार आहे, तेव्हा अशा सुविधेंची अत्यंत आवश्यकता आहे. हे रुग्णालय निश्चितच पशुपालकांसाठी एक वरदान ठरेल आणि परिसरातील पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेईल अशी सद्भावना मानवांनी व्यक्त केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page