लोणावळ्यात चिमुकलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक २४/०३/२०२५ रोजी सकाळी ११.१५ वाजताचे सुमारास लोणावळा ता. मावळ जि. पुणे येथे जयचंद चौक जवळ नगरपरिषद शौचालय समोर रोडवर मुलगी निर्भया वय ११ वर्शे ९ महिने हि व्हि. पी. एस शाळा लोणावळा येथे शाळेत जात असताना आरोपी नामे श्रीपती महादेव गायकवाड रा. साने चौक, स्वराज्य हौउसींग सोसायटी,चिखली, पुणे हा तिचे जवळ आला व तिस तु चप्पल का नाहीं घातली असे म्हणुन तिचा वाईट उद्देषाने तिचा उजवा हात पकडुन तीला दुकानात घेवुन गेला व चिमुकली नको म्हणत असताना तिला जबरदस्तीने चॉकलेट व फ्रुटी घेवुन देवुन तिला तु माझे सोबत चल असे म्हणुन पळवुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन वरील आरापी विरूध्द सौ. पुनम विजय क्षीरसागर वय ३२ वर्षें, धंदा गृहिणी रा. आश्रय लॉन्ड्रींजवळ, कुसगाव लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वरुन आरोपीवर लो.श.पो.स्टे.गु. रजि. नं. १२० /२०२५ भारतीय न्याय संहीता १३७ (२ ), ६२ , पोस्को १२ दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब वडगाव मावळ येथे खाना. गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रमेश भिसे हे करीत आहेत. दाखल अंमलदार पो हवा कडाळे व नं २१०५.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page