लोणावळा नगरपरिषदेच्या पुतळ्याची आणि परिसरातील दुरावस्था,वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

मावळ मराठा न्युज -लोणावळा,प्रतिनिधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर आली असताना, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील पुतळ्याची आणि परिसरातील व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे. वंचित बहुजन आघाडी, लोणावळा शहर शाखेने ही बाब स्पष्टपणे जनतेसमोर मांडली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सडकून टीका केली आहे.अशोक स्तंभावर शेवाळ साचलेले आहे, त्याला अद्याप रंग दिला गेलेला नाही CCTV कॅमेरा लटकत असून तो कधीही कोसळू शकतोस्तंभावर लावलेले लाईट्स बंद पडले असून परिसर रात्री काळोखात बुडतो”प्रशासन वेळीच पावले उचलत नसेल, तर वंचित बहुजन आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात जाईल,” असा ठाम इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.सामान्य नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण असून, बाबासाहेबांच्या स्मारकाचा असा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट सूर जनतेतून उमटतो आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page