बिग बाॅस शोमधील पक्षपातीपणा: प्रेक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया



मावळ मराठा न्युज :-पुणे,सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या रिअलिटी शोमध्ये पक्षपातीपणा आणि मराठी संस्कृतीचा अपमान यावरून प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्पर्धक निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यावर मराठी कलाकारांचा अपमान करण्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः अरबाज पटेलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.प्रमुख मुद्दे:फेवरिटिझम आणि निक्कीला पाठिंबा: प्रेक्षकांच्या मते, निक्की तांबोळी वारंवार चुकीचं वागूनही तिला शोमधून बाहेर काढले जात नाही किंवा तिला शिक्षा केली जात नाही. तिच्या वर्तनाकडे निर्मात्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं प्रेक्षकांनी निदर्शनास आणलं आहे. तसेच मराठी कलाकार रॅपर आर्या जाधव तिच्यावर खूप मोठा अन्याय या निकि तांबोळीसाठी केला जात असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे.मराठी संस्कृतीचा अपमान: अरबाज पटेल याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.निर्णायकतेचा अभाव: शोच्या निर्मात्यांवर पक्षपातीपणे काही स्पर्धकांना फेवर केल्याचे आरोप होत आहेत. जे स्पर्धक मराठी संस्कृतीचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना षडयंत्र करून शोमधून बाहेर काढलं जात असल्याची चर्चा आहे.प्रेक्षकांची मागणी:प्रेक्षकांनी शोच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आता मागणी केली आहे की, कितीही टीआरपी मिळत असला तरी, निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन, शोमध्ये न्याय प्रस्थापित केला जावा.आता बघणं महत्त्वाचं ठरेल की, निर्माते प्रेक्षकांच्या या मागण्यांकडे कसं लक्ष देतात आणि शोमध्ये बदल घडवून आणतात का?




