उबाठा गट लोणावळा शहराला खिंडार,शिवसेना शिंदे पक्षात इनकमिंग सुरु

मावळ मराठा न्युज – लोणावळा,शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोणावळा शहर उबाठा गटातील माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधु परदेशी, महिला आघाडी सह शहरसंघटिका प्रिया पवार, महिला विभाग संघटिका अनिता गायकवाड,विभाग संघटिका मार्गारेट मुन्नास्वामी, शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विजय आखाडे, विभागप्रमुख मंगेश येवले, माजी उपविभाग प्रमुख अनिल कालेकर, कल्पेश तिखे, दुर्वेश कडू, प्रणव तिकोने, संकेत जाधव, आदित्य शिंदे, दुर्वेश बोडके, प्रथमेश पाठारे यांचा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे,संघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत,देहू शहर प्रमुख सुनिल हगवणे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्व्यक नंदूभाऊ कडू,महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page