तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित जी एन एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा सेवाव्रती शपथविधी समारंभ संपन्न




मावळ मराठा न्युज :- तळेगाव,जी एन एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा सेवाव्रती शपथविधी समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर प्राचार्य मोनालिसा पारगे यांनी समारंभाचे अध्यक्ष डॉ.शालिग्राम भंडारी प्रमुखपाहुण्या भारती विद्यापीठ संचलित नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या डॉ वीना साखरदंडे या मान्यवरांचं सभागृहातील उपस्थितांच्या वतीने शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी यथोचित स्वागत केलं. त्यानंतर नर्सिंग स्कूल प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा लाइटिंग लॅम्प च्या प्रतिकात्मक स्वरूपाने रुग्णसेवेचा शपथविधी समारंभ विधिवत संपन्न झाला. नर्सिंग क्षेत्रातील अनुभव संपन्न प्राचार्य डॉ.विना साखरेदंडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ देताना आपल्या रुग्णसेवेतील कार्य कर्तव्य क्षमतेची जाणीव अतिशय योग्य शब्दात देऊन शपथ दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शालिग्राम भंडारी यांनी आपण हे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारित असताना आपण सर्व खरोखरच भाग्यवान आहात, भाग्यवान अशा अर्थाने आहात की शंभरवर्षाची आरोग्यसेवेची उज्वल परंपरा असणाऱ्या तळेगाव जनरल हॉस्पिटल सारख्या उत्तम संस्थेत शिक्षण आणि संस्कार आत्मसात करण्याची संधी आपल्याला लाभली. कैवल्याचे धनी होणार आहात.हा अत्यंत पवित्र प्रसन्न शपथविधी समारंभ सर्वर्थाने यशस्वी होण्यास संस्थेच्या शैक्षणिक व्यवस्थापकीय विभागा इतकेच विशेष परिश्रम विद्यार्थ्यांनी घेतलेत त्यात सूत्रसंचालन ज्योती सूर्यवंशी आणि नीलम येवले यांनी केले. आथितीचे स्वागत प्राचार्य मोनालिसा पारगे, स्वागतगीत द्वितीयवर्षाचे विद्यार्थी, शपथविधी उपप्राचार्य क्रिस्टिना रणभिसे, कार्यक्रमाची सांगता सीनिअर ट्यूटर – युक्ता नलावडे ध्वनी व्यवस्था, अभिषेक बुग्गे, फोटोग्राफी परमेश्वर राठोड,स्वागतगीत द्वितीय वर्षाचे विद्यार्थी,संपूर्ण नियोजन तृतीय वर्षाचे विद्यार्थी या सर्वांचा विशेष परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी झाला.




