निवृत्ती दुडे संचालित वाय सी क्लासेस यांच्या वतीनेलोणावळ्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न




मावळ मराठा न्युज – लोणावळा,वाय. सी. क्लास हा मागील कित्येक वर्षापासून दरवर्षी लोणावळा परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहे. यावर्षीही वाय.सी. क्लासेस लोणावळा तर्फे आयोजित इयत्ता दहावी मध्ये मिळविलेल्या यशाबद्दल गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा वार रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दु. ४ वाजता लोणावळा नगरपालिकेचे प्रियदर्शनी संकुल लोणावळा, गावठाण येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. श्रीधर पुजारी, मा.शिक्षण सभापती लोणावळा नगरपरिषद श्री. जितेंद्र भाई कल्याणजी,ज्येष्ठ समाजसेवक श्री.नंदकुमार वाळंज, ॲड. श्री.संजय पाटील,संपादक एम एन न्यूज,गुरुकुल हायस्कूल लोणावळ्याचे मुख्याध्यापक श्री.खुरंगे सर,ज्येष्ठ पत्रकार श्री विशाल विकारी, श्री विजय रसाळ पर्यवेक्षक व्ही.पी.एस. हायस्कूल, लोणावळा,श्री सुनील म्हस्के, मावळ भारताचे पत्रकार श्री गुरुनाथ नेमाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत २०२५ चा गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे सन्माननीय मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कलाक्षेत्रातील श्री अतिश बजरंग थोरात, लेखन क्षेत्र सौ वैजयंती जगताप, वयाच्या ५८ व्या वर्षी इयत्ता बारावी पास झालेल्या बनताबाई काजळे – चोपडे तसेच एम पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये शेतकरी कुटुंबातील श्री दत्ता विठ्ठल शेडगे आदींचा वाय. सी. क्लासेस कडून विशेष सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमात वाय. सी. क्लासेसचे संचालक श्री निवृत्ती दुडे यांनी प्रास्ताविकेद्वारे क्लासचा सुरुवातीपासूनचा प्रवास ते आजची विद्यार्थी आणि आई-वडिलांच्या समोरील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. तसेच,विविध मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा तसेच येणाऱ्या काळातील विविध आव्हाने कशी पार करता येईल याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. वाय. सी. क्लास हा मावळातला एकमेव असा खाजगी क्लास आहे की जो विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करतो. अशा प्रकारचे गौरवोद्गार सर्व मान्यवरांनी कौतुकाने केले. वाय.सी. क्लासेसची विद्यार्थिनी अबोली बोडके हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेत ९३ .८३ % मिळून लोणावळा परिसरात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. तसेच,पूजा पांडे वाय सी क्लासेसच्या विद्यार्थिनीने अकाउंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळविल्याने तिचाही सन्मान करण्यात आला. वाय. सी. क्लासेस कडून अथक परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापक वृंदांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. परिसरातील सर्व शाळांचे प्रथम तीन क्रमांकातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सदर कार्यक्रम पाहून भारावून गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय शेख मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला श्री दीपेश गोणते सर, सौ सुजाता आंबेकर मॅडम, श्री मयूर कनगुटकर सर व वाय. सी क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमासाठी खूपच मेहनत घेतली. तसेच,सदर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालकांचे आभार येवले सर यांनी मानले.




